शिरोडा वेळागर येथील स्ट्रीट लाईट बंद असल्याने स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांची गैरसोय
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले तालुक्यातील शिरोळा वेळागर हे पर्यटन स्थळ असून या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात सध्या पर्यटहंगाम सुरू झाला असून या ठिकाणची स्ट्रीट लाईट बंद असल्याने होणाऱ्या गैरसोई बाबत स्थानिक ग्रामस्थांसह येथील माजी ग्रामपंचायत सदस्य आजू अमरे यांनी ग्रामपंचायत प्रशासना बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
येथील स्ट्रीट लाईट बरेच दिवस बंद असून त्याबाबत शिरोडा ग्रामपंचायतीला कळवून देखील अद्याप पर्यंत स्ट्रीट लाईट सुरळीत न केल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे आजू अमरे यांनी म्हटले आहे.
शिरोडा वेळागर येथे येणाऱ्या पर्यटकांकडून ग्रामपंचायत कर वसुली करते मात्र अशा प्रकारच्या सुविधा पर्यटकांना नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे पर्यटकांकडून कर वसूल करणाऱ्या ग्रामपंचायतीने पर्यटकांना योग्य त्या सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे.
Post a Comment
0 Comments