दीपक केसरकर यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शेतकरी मच्छीमार यांची दिशाभूल करू नये... आजू अमरे,राजू आंदुर्लेकर
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
शिरोडा वेळागर येथे झालेल्या भूमिपूजनाच्या वेळी कुठल्याही प्रकारे दंगल घडलेली नाही तर लोक न्याय मागण्यासाठी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु पोलिसांनी त्यांना अडवल्याने तेथे आक्रोश निर्माण झाला तेथे कोणत्याही प्रकारची दंगल झाली नाही दीपक केसरकर यांनी गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले परंतु याच्या आधी असे अनेक आश्वासन दिले पण अस्तित्वात काहीच नाही खरंतर गुन्हे हे दीपक केसरकर च्या आदेशाने दिले गेले असे समजण्यात आले सर्व गैरसमज पसरवण्यामागे राजन तेली यांचा कुठलाही हात न होता या उलट राजन तेली यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना पर्यटन मंत्र्यांची भेट करून दिली व उपोषणाला आणि आंदोलनाला पर्यटन पर्यटनमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी प्रयत्न केले.
गुन्हे मागे घेतले असेल तर केसरकरांनी येत्या 24 तासात ते वर्तमानपत्राच्या व मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर सादर करावे उगाच दिशाभूल करू नये तसेच सर्वे नंबर 39 बाबत फक्त पत्रकार परिषद घेऊन तोंडी आश्वासने दिली.
सर्वे नंबर 39 वर झालेल्या पेन्सिलच्या नोंदी एमटीडीसी ने रद्द केलेल्या असतील तर कोरा सातबरा प्रसिद्ध करून दाखवावा व 9 हेक्टर क्षेत्र वगळले असे म्हणणाऱ्या दीपक केसरकर यांनी शेतकऱ्यांना दिलेले पत्र सुद्धा प्रसिद्ध करून दाखवावे त्या पत्रामध्ये 9 हेक्टर क्षेत्र वगळण्याचे कुठलेही आदेश नाहीत हे पत्र सर्व शेतकऱ्यांना अध्यक्ष राजू आंदुर्लेकर यांनी दाखवले असून शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
त्यामुळे दीपक केसरकर यांनी गुन्हे मागे घेतले व सर्वे नंबर 39 व नऊ हेक्टर वगळले असे सांगून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेची व शेतकरी मच्छीमार यांची दिशाभूल करू नये.
शिरोडा वेळागर येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी ताज प्रकल्पातून वगळल्या बाबत अद्याप पर्यंत कोणतीही कायदेशीर प्रक्रिया होऊन त्याची कागदपत्रे शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत प्राप्त झालेली नाहीत
गेली 30 वर्ष सुरू असलेला शिरोडा वेळागर येथील शेतकऱ्यांचा संघर्ष आजही सुरू आहे गेली पंधरा वर्षे आमदार असलेल्या दीपक केसरकर यांनी खऱ्या अर्थाने येथील शेतकऱ्यांना न्याय द्यायचा होता तर गेल्या पंधरा वर्षात आम्हाला न्याय का दिला नाही आता केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्हा शेतकऱ्यांना विचारात न घेता पोलीस बळाचा वापर करून पाच प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम दिखाऊपणासाठी करण्याचा प्रयत्न केला परंतु तोही आम्ही हाणून पाडला यावेळी पोलीस बळाचा वापर केलेल्या दीपक केसरकर यांनी शेतकऱ्यांना पोलीस बंदोबस्तात ठेवून लोकांना भूमिपूजन केल्याचे भासवण्यासाठी पर्यटनमंत्र्यांची दिशाभूल करून वेळागर येथे आणले परंतु शेतकऱ्यांना सामोरे न जाता केसरकर यांना पोलीस बंदोबस्तात वेळागर येथून पळून जावे लागले याचे केसरकर यांनी आत्मपरीक्षण करावे
असे राजू आंदुर्लेकर व आजू अमरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Post a Comment
0 Comments