राज्यस्तरीय भालाफेक क्रीडा स्पर्धेत राज्यात प्रथम आलेल्या दर्शन पडतेचा मेढा, निवती ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले तालुक्यातील मेढा निवृती ग्रामपंचायतच्या वतीने बालेवाडी पुणे येथे १७ वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय भालाफेक क्रीडा स्पर्धेत निवती मेढा येथील दर्शन दशरथ पडते यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ग्रामपंचायत मेढा निवतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच अवधूत रेगे यांनी दर्शन याचे तोंड भरून कौतुक करत .त्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर मिळविलेल्या यशा बद्दल आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे.त्याच्या या यशामुळे मेढा निवती गावाचे नाव देखिल अभिमानाने उंचावली असून त्याचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतील असे प्रतिपादन यावेळी केले.त्याचप्रमाणे त्याला लाभलेल्या यशात क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन मोलाचे असून त्याचे देखील अभिनंदन यावेळी करण्यात आले.तसेच त्यांचे आईवडील त्याचप्रमाणे त्याला यशस्वी होण्यासाठी केलेल्या सर्वांचे कौतुक अभिनंदन यावेळी करण्यात आले.तसेच ग्रामपंचायत वतीने आर्थिक मदत सूपूर्द करण्यात आली.यावेळी त्यांच्या समवेत ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रज्योत मेतर, तृप्ती कांबळी,निवती पोलिस पाटील जोगेश सारंग, प्राजक्ता निवतकर, नमिता घाटवळ, शितल पाटकर ,माजी सरपंच रमाकांत मेतर,माजी उपसरपंच अजित खवणेकर, दशरथ पडते, रामचंद्र पडते, रत्नाकर पडते, माजी ग्रामपंचायत सदस्य माधुरी कोचरेकर, अनामिका कुडाळकर, परमेश्वर पडते, विक्रम खवणेकर सीआपी अंजली मेतर ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments