Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आता ८२७२ उमेदवार निवडणूक रिंगणात

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी 
आता ८२७२ उमेदवार निवडणूक रिंगणात

नवप्रभात NEWS / मुंबई

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची उत्कंठा अधिकच तीव्र होत चालली आहे. राजकीय पक्ष आपापल्या राजकीय आघाड्या मजबूत करण्यात व्यस्त आहेत. आज सोमवारी दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. आता कोणत्याही उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आता केवळ ८२७२ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.
       निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी एकूण १०,९०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १६५४ उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले, तर ९२६० उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यापैकी ९८३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. या सर्व प्रकारानंतर आता ८२७२ उमेदवार उरले असून २० नोव्हेंबरला भवितव्याचा फैसला ईव्हीएममध्ये होणार आहे.
       २० नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा जागांवर मतदान होणार आहे, तर त्याचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. याबाबत आज सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याचबरोबर काही बंडखोर उमेदवारही रिंगणात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते चांगलेच अडचणीत आले आहेत. यात काहींनी अर्ज मागे घेतले तर काहींनी कायम ठेवले आहेत. यामुळे दोन्ही आघाड्यांसमोर आव्हान उभे राहिलं आहे.

Post a Comment

0 Comments