Type Here to Get Search Results !

जेईई ॲडव्हान्स परीक्षा देण्यासाठी आता तीन वेळा मिळणार संधी

जेईई ॲडव्हान्स परीक्षा देण्यासाठी आता तीन वेळा मिळणार संधी

नवप्रभात NEWS / मुंबई

 जेईई ॲडव्हान्स परीक्षा देण्यासाठी आधी विद्यार्थ्यांना दोन वेळा संधी देण्यात येत होती. मात्र यामध्ये आता बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स परीक्षा देण्यासाठी तीन वेळा संधी मिळणार आहे.
      आयआयटी कानपूर लवकरच जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी माहिती बुलेटिन प्रसिद्ध करणार आहे. यामध्ये परीक्षेची तारीख, नोंदणी प्रक्रिया, अर्ज फी, परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम, मार्किंग योजना आणि इतर तपशीलांचा समावेश असणार आहे. या परीक्षेसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित अनिवार्य विषयांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच जे विद्यार्थी २०२२ मध्ये किंवा त्यापूर्वी इयत्ता १२वी (किंवा समतुल्य) परीक्षेत पहिल्यांदा बसले होते, ते परीक्षेला बसण्यास पात्र नाहीत, असे म्हटले आहे. आयआयटी कानपूरने गेल्या वर्षांपासून अभ्यासक्रमात कोणताही बदल केला नसल्याचेही सूचित केले आहे. अधिकृत माहितीसाठी विद्यार्थी jeeadv.ac.in येथे भेट देऊन पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेला अभ्यासक्रम डाउनलोड करू शकणार आहेत.

Post a Comment

0 Comments