'वंशज विश्वकर्माचे' ह्या पुस्तकात दाभोली वेंगुर्ल्याचे जेष्ठ क्रीडा संस्कृती प्रचारक व फेडरेशन पंच अशोक दाभोलकर -मेस्त्री ह्यांचा समावेश
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
ख्यातनाम लेखिका श्रीमती वीणा चारी ह्यांच्या स्वलिखित पुस्तक "वंशज विश्वाकर्माचे" या पुस्तकाचा "प्रकाशन सोहळा" शनिवार दिनांक १४ डिसेंबर, २०२४ रोजी सकाळी ११ वाजता, "साहित्य संघ मंदिर" गिरगाव, मुंबई-४०० ००४ येथे सन्माननीय डॉ.रवींद्र शोभणे सर, "अध्यक्ष ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर" व "अध्यक्ष मराठी विश्वकोश मंडळ महाराष्ट्र" नागपूर, यांच्या "शुभहस्ते" प्रकाशित होणार आहे.
ह्या पुस्तकात विविध क्षेत्रात सामाजिक मुल्यांचे जतन करीत आपल्या कर्तृत्वाने विश्वकर्मिय समाजाचे नांव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावणार्या खालील १९ विश्वकर्मिय बांधवांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला असून त्यात ठाणे स्थित दाभोली वेंगुर्ला सिंधुदुर्गचे जेष्ठ क्रीडा संस्कृती प्रचारक व भूतपूर्व फेडरेशन शुटिंगबॉल रेफरी अशोक दाभोलकर-मेस्त्री ह्यांचा समावेश आहे.
या सोहळ्यास माजी "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा" डॉ.उषा तांबे, श्री.जयु भाटकर, माजी आय.आर.एस ऑफिसर,(सह्याद्री, दूरदर्शन) तसेच वैष्णवी व्हिजन चे डायरेक्टर, श्री. बाबासाहेब आंबेडकर "राष्ट्रीय वंचित आघाडी, अध्यक्ष. प्रतिष्ठित उद्योजक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती,समाजसेवक,कलाकार,अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटीज, अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न रहाणार आहेत.
ह्या पुस्तकातील सन्माननीय विश्वकर्मियांची नांवे खालील प्रमाणे आहेत
०१) चित्रमहर्षी श्री. बापूराव पेंटर ( कोल्हापूर)
०२) पद्मभूषण श्री. राम सुतारसर,
०३) श्री. वामन सुतार (उद्योजक),
०४) महाराष्ट्रभूषण श्री.नारायण सोनावडेकर.
५) डाॅ. श्री. गोविंद विष्णू मसूरकर.
६) श्री. वसंत मेस्री ( M.D. Suvidya Inst. of Tech.),
०७) श्री. कृष्णकुमार काणेकर ( उद्योजक, समाजसेवक, नट, गायक),
०८) श्री. अरुण आंबेरकर ( Executive Art Director),
०९) श्री.अशोक गणेश दाभोलकर-मेस्री (क्रीडा),
१०) श्री. अनिल राम सुतार ( वास्तुविशारद, शिल्पकार),
११) पंडीत श्री. रवी चारी ( सतारवादक),
१२) श्री. सजंय मेस्री ( कार्टुनिस्ट, लेखक, वक्ता),
१३) श्री. बाळा पांचाळ ( नाट्यनिर्माता, दिग्दर्शक, कलाकार),
१४) श्री. मनोज पांचाळ (संचालक- जाणीव वृध्दाश्रम, कल्याण),
१५) श्री. रविन्द्र बाबूराव मेस्री ( आर्टिस्ट-कोल्हापूर),
१६) श्री. चंद्रकांत परुळकर ( उद्योजक,शास्रज्ञ,आर्टिस्
,कोल्हापूर),
१७) श्री. विनोद मेस्री ( प्रसिध्द उद्योजक, प्रेरणादायी वक्ता),
१८) श्री. दत्ताराम कृष्णकांत चारी ( आर्टिस्ट,तंत्रज्ञ),
१९) श्री. अनिल सुतार ( नृत्यदिग्दर्शक, लेखक, कवी),
Post a Comment
0 Comments