निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे खर्च निरीक्षक यांच्याकडून प्रशिक्षण संपन्न
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक उमेदवारांचे खर्च प्रतिनिधी यांनी खर्चाचे लेखे विहीत पध्दतीने उमेदवारांच्या खर्च रजिस्टर मध्ये नोंदविण्याची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी व खर्च विषयक सूचना देण्यासाठी तसेच विहित वेळेत अभिलेख निवडणूक खर्च निरीक्षक यांना तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रशिक्षण खर्च निरीक्षक डॉ. दिव्या के.जे. यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपन्न झाले,असल्याची माहिती जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे समन्वय अधिकारी अमित मेश्राम यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 चे कलम 77 नुसार निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा दैनदिन खर्चाचा हिशेब प्रचार कालावधीमध्ये किमान 3 वेळा निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले खर्च निरीक्षक यांच्याकडून तपासणे आवश्यक आहे.
या प्रशिक्षणास खर्च निरीक्षक डॉ. दिव्या के.जे., जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे समन्वय अधिकारी अमित मेश्राम, डॉ. शिवप्रसाद खोत, कणकवली कुडाळ व सावंतवाडी मतदार संघातील उमेदवार व त्यांचे खर्च प्रतिनिधी तसेच तीनही मतदार संघातील लेखापथक प्रमुख उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केल्यापासून ते निकालापर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत खर्च निरीक्षक यांनी उपस्थितांना आवश्यक मार्गदर्शन केले. जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे समन्वय अधिकारी अमित मेश्राम, डॉ. शिवप्रसाद खोत, यांनी खर्च सादर करणे संदर्भातल्या सूचनांचे विस्तृत सादरीकरण केले.
Post a Comment
0 Comments