Type Here to Get Search Results !

१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार ; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान


१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही 
तर ३००० वसुल करणार ; भाजपा 
महिला नेत्याचं वादग्रस्त विधान

 नवप्रभात NEWS / कोल्हापूर 

 महायुतीने आणलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची' राज्यभर चर्चा सुरू आहे. या योजनवरुन भाजपा खासदार धनंजय महाडिक यांनी काही दिवसापूर्वी वादग्रस्त विधान केले होते. दरम्यान, आता कोल्हापुरातून आणखी एक या संदर्भात बातमी समोर आली आहे. कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी एका सभेत १५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार, असं वादग्रस्त विधान केले आहे. 
      भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेद्वारे महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मिळत आहेत. महायुतीच्या या योजनेची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीतही ही योजना फायद्याची ठरत आहे. तर दुसरीकडे काही दिवसापूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील एका सभेत वादग्रस्त विधान केले होते. आता पुन्हा एकदा कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी वादग्रस्त विधान केले आहे. 
      करवीर पन्हाळा गगनबावडा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ गारीवाडे या गावातील जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे विधान केले. महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव म्हणाल्या, १५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार अस वक्तव्यं केलं आहे. या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   
धनंजय महाडिकांनीही केले होते वादग्रस्त विधान
एका सभेत बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो, असे वक्तव्य महाडिक यांनी केले आहे. ''जर इथे काँग्रेसची रॅली निघाली आणि त्यामध्ये आपल्या योजनेचे १५०० रुपये घेतात त्या महिला दिसल्या त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या. घ्यायचे आपल्या शासनाचे आणि गायचे त्यांचे असे नाही चालणार'', असा दम महाडिक यांनी भरला आहे. भर सभेमध्ये महाडिक यांचे हे वक्तव्य आलेले आहे.

Post a Comment

0 Comments