विशाल परब यांचे भाजपच्या पदावरून निलंबन
नवप्रभात NEWS / सावंतवाडी
भारतीय जनता पार्टी ही संघटना आपल्या शिस्तबद्ध कार्यप्रणाली साठी परिचित आहे. या संघटनेमध्ये पक्षाचा आदेश हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येक कार्यकर्त्यासाठी बंधनकारक मानला जातो.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल प्रभाकर परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून पक्षाच्या वरिष्ठांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना देवूनही त्यानी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे.ही बाब पक्ष शिस्तीच्या विरोधी आहे. त्यामुळे प्रदेशाच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष यांना दिलेल्या अधिकारातून त्यांचे पक्षाच्या आता कार्यरत असलेल्या पदावरुन निलंबन करण्यात येत आहे.तसेच त्यांचे भाजपा प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात येत असून यापुढे त्यानी आपल्या प्रचार कीवा अन्य बाबीसाठी प्रत्यक्ष,अप्रत्यक्षपणे पक्षाचे नाव,पद आणि पक्षाच्या नेत्यांची नावे कीवा फोटो वापरू नये असे बजावण्यात येत आहे.तसे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
त्याचप्रमाणे त्यांच्या या पक्षविरोधी कामात त्याना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात येते की,पक्षातून निलंबित केलेल्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारची मदत केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
Post a Comment
0 Comments