सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, ०४ उमेदवारांची माघार
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ येतात. या निवडणुकीसाठी आज माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यात ०४ उमेदवारांनी माघार घेतली असून आता १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
२६८- कणकवली विधानसभा मतदार संघात एकूण ८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ०२ उमेदवारांनी माघार घेतली असून आता ०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार- (०६)
१. श्री चंदक्रात आबाजी जाधव (बहुजन समाज पार्टी)
२. श्री नितेश नारायण राणे (भारतीय जनता पार्टी)
३. श्री. संदेश भास्कर पारकर (शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे )
४. श्री. गणेश अरविंद माने (अपक्ष)
५. श्री. बंदेनवाझ हुसेन खानी (अपक्ष)
६. श्री. संदेश सुदाम परकर (अपक्ष)
उमेदवारी मागे घेतलेले उमेदवार- (०२)
१. श्री प्रकाश दत्ताराम नारकर (अपक्ष)
२. श्री विश्वनाथ बाबू कदम (अपक्ष)
२६९- कुडाळ विधानसभा मतदार संघात एकूण ०७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ०२ उमेदवारांनी माघार घेतली असून आता ०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार- (०५)
१. श्री. रवींद्र हरिश्चंद्र कसालकर (बहुजन समाज पार्टी)
२. श्री. वैभव विजय नाईक (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
३. श्री. निलेश नारायण राणे (शिवसेना)
४. श्री. अनंतराज नंदकिशोर पाटकर (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी)
५. श्रीम. उज्वला विजय येळावीकर (अपक्ष)
उमेदवारी मागे घेतलेले उमेदवार- (०२)
१. श्रीमती स्नेहा वैभव नाईक (अपक्ष)
२. श्री प्रशांत नामदेव सावंत (अपक्ष)
270- सावंतवाडी विधानसभा मतदार संघात एकूण ०६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी एकाही उमदेवाराने माघार घेतली नसल्याने एकूण ०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार- (०६)
१. श्री. दिपक वसंतराव केसरकर (शिवसेना)
२. श्री. राजन कृष्णा तेली (शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे))
३. श्रीम. अर्चना संदीप घारे (अपक्ष)
४. श्री. दत्तराम विष्णू गांवकर (अपक्ष)
५. श्री. सुनील उर्फ यशवंत वसंत पेडणेकर (अपक्ष)
६. श्री. विशाल प्रभाकर परब (अपक्ष)
विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.
Post a Comment
0 Comments