जिल्हास्तरीय युवा महोत्सव संपन्न
तरुणांनी कलेची जोपासना करावी....
जिल्हाधिकारी अनिल पाटील
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
सिंधुदुर्ग जिल्ह्याला पारंपरिक लोककलेचा वारसा लाभलेला आहे. युवक- युवतींनी शालेय शिक्षणाबरोबर विविध कला आत्मसात करणे आवश्यक आहे. आज जिल्हास्तरीय युवा महोत्सवात अनेकांनी आपल्या कला सादर केल्या. अशा महोत्सवांमध्ये तरुणांनी आपली कला सादर करुन आपल्या पारंपरीक कलेची जोपासना करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी युवा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात केले.
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा नियोजन समिती सभागृहात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, युवा कार्यक्रम मंत्रालय भारत सरकार अंतर्गत जिल्हा क्रीडा विभाग व नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवामहोत्सव संपन्न झाला. महोत्सवाचा समारोप कार्यक्रम जिल्हाधिकारी अनिल पाटील उपजिल्हाधिकारी शारदा पोवार ,बालाजी शेवाळे ,आरती देसाई, जिल्हा माहीती अधिकारी मुकुंद चिलवंत, नेहरू युवा केंद्राचे युवा समन्वयक, मोहीत कुमार सैनी, जिल्हा क्रिडा अधिकारी विद्या शिरस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवी पाटील यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन आणि विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री देशमुख यांनी तरुणांनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन पर्यावरण पूरक तसेच जैवविविधता, आरोग्य अशा विषयांवर कला कृती सादर कराव्यात. याशिवाय हस्तकला, चित्रकला अशा विविध कला सादर कराव्यात असे आवाहन केले.
यावेळी विज्ञान प्रदर्शन, मेळा समूह, लोकनृत्य आणि सोलो ,समूह लोकगीत आणि कथालेखन, कविता लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, हस्तकला, मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रत्येक स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त स्पर्धकांना पारितोषक रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात स्पर्धक युवक- युवती , शाळा महाविद्यालय, युवा मंडळ, बचत गटातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.
समारोप प्रसंगी पारितोषक वितरण करण्यात आले. या युवा महोत्सवात विविध स्पर्धकांनी आपली कला सादर केली .विविध कला प्रकारामध्ये पार पडलेल्या स्पर्धा मध्ये विजेत्या ठरलेल्या प्रथम, द्वितीय ,तृतीय, स्पर्धकांना राज्यस्तरावर प्रतिनिधित्व साठी पाठविण्यात येणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धकाना रोख पारितोषक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पणदुर कॉलेजचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी दीपेश गावडे , क्रीडा अधिकारी विद्या शिरस , नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक मोहित कुमार सैनी , अपेक्षा मांजरेकर जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सय्यद बसीन आदींसह कार्यक्रमाचे पंच, युवक- युवती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
विविध स्पर्धांची पारितोषिक वितरण
चित्रकला स्पर्धा - (प्रथम ) राम सूर्यकांत बिववणेकर, (द्वितीय ),रिया अतुल सावंत (तृतीय )श्रेयस चांदरकर,
कविता लेखन स्पर्धा -रामचंद्र राऊळ (प्रथम) श्रुति हेवाळे (द्वितीय ) मेहक महिम इब्राहिम शेख (तृतीय) ,
मोबाईल फोटोग्राफी - -ऋषिकेश दिनेश मेस्त्री (प्रथम),कौस्तुभ सरवणकर (द्वितीय ),गौरव प्रियदर्शन राऊळ (तृतीय ),
वक्तृत्व स्पर्धा -प्रणिता राऊळ (प्रथम ) सायली खोत (द्वितीय) , गौरी रामचंद्र चाळके (तृतीय),
विज्ञान प्रदर्शन -दादासाहेब तिरोडकर कॉलेज पणदूर,(प्रथम) गॅलेक्सी ग्रुप(द्वितीय), एस पी एस कॉलेज (तृतीय),
वैयक्तिक विज्ञान प्रकार प्रदर्शन
-नूतन सुनील भावे (प्रथम), सुमेध लक्ष्मीकांत मालवणकर (द्वितीय ),आर्या निलेश राऊळ (तृतीय ), लोकगीत ग्रुप -दादासाहेब तिरोडकर हायस्कूल (प्रथम ' ) रंग खांबा ग्रुप कणकवली (द्वितीय ), वामनराव महाडिक विद्यालय तरळे (तृतीय),
कथालेखन स्पर्धा -ऐश्वर्या प्रमोद परब (प्रथम ) ,साक्षी घाडीगावकर (द्वितीय ), निसाबा काझी (तृतीय ),
युवा कृती स्पर्धा -
पूर्वा चांदेरकर, (प्रथम ) अवधूत आचरेकर (द्वितीय ) ममता अंगचेकर (तृतीय),
समूह लोकनृत्य -
एस पी के सावंतवाडी(प्रथम) विक्ट्रा देवगड (द्वितीय ) न शा पंत वालावलकर कॉलेज देवगड (तृतीय) अशा विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
Post a Comment
0 Comments