ख्रिस्ती बांधवांची मते हि निर्णायक असून जागृतेने मतदान करावे-कार्मिस आल्मेडा
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
राज्यात सध्या विधानसभेचे वारे वाहत असून येणाऱ्या सिंधुदुर्ग विधानसभा निवडणूकीत सावंतवाडी, कुडाळ व कणकवली मतदार संघात अत्यंत चुरशीची अपेक्षित असून अल्पसंख्याक ख्रिस्ती समाजाची यात महत्वपूर्ण निर्णायक भूमिका असणार आहे. तिन्ही मतदार संघात बऱ्यापैकी समाजाचे मतदार असून या वेळी जागृकतेने मतदान करण्याचे आव्हान महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद सिंधुदुर्गचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते कार्मिस आल्मेडा यांनी केले आहे.
आतापर्यंत आपल्या समाजाचा राज्यकर्त्यानी फक्त फायदाच घेतला असून आमच्या समाजावर अन्याय केला आहे. या अगोदर सत्ताधारी अल्पसंख्याक मंत्र्यांना वारंवार निवेदन देऊन देखील त्याचा काहीही कायदा झालेला नाही. आज अल्पसंख्याक दाखला नसल्याने समाजातील कित्येक मुलाना पुढील शिक्षण, नोकरीसाठी मुकावे लागले आहे. मौलाना आझाद मंडळाव्दारे शासन हजारो कोटी खर्च केल्याचे दाखवत असून त्यात सिंधुदुर्गातील किती ख्रिस्ती लोकांना या राज्यकर्त्यांनी फायदा करून दिला हे जाहिर करावे. महिला बचत गट, स्वयंरोजगार, शिक्षण, शेतकरी, मच्छीमार बांधव अशा किती तरी योजना या मंडळामार्फत राबविल्या जाऊ शकतात. परंतु या हजारो कोटी रूपयांतून सिंधुदूर्ग ख्रिस्ती लोक अद्यापपर्यंत वंचित आहेत, मुलाची स्कॉलरशिप देखील मिळत नाही. अल्पसंख्याकच्या योजना राबविण्याकरिता ओरोस येथे ऑफिस देणार असल्याचे या आधी सांगण्यात आले होते. परंतु ते अजून दिले नाही. याला सत्ताधारी पक्षासोबत विरोधी पक्ष देखील तितकाच जबाबदार आहे. देवदर्शनासाठी देखील शासनाकडून योजना राबविण्यात आली यात देखील ख्रिस्ती बांधवांवर अन्याय झाल्याचे आल्याचे दिसते. वेगवेगळ्या शासन समित्या आहेत. त्यात किती ख्रिस्ती लोकांना प्राधान्य देण्यात आले आहे. संजय गाधी. वृध्द कलाकार मानधन, जिल्हा नियोजन दक्षता समिती, आज आमच्या बांधवांचे वृध्द कलाकारांचे अर्ज समाजकल्याण मध्ये गेलेले आहेत. आणि ते वंचित राहिले आहेत. समाजाचे सर्व राजकीय पक्षात लोक काम करत असून जि. प. सदस्य, नगरसेवक जिल्हा बँक, सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, इत्यादी आपल्या स्वकर्तत्वावर झालले आहेत. ख्रिस्ती समाजाने कधीच जात-पात, धर्म पाहिलेला नाही. सर्व लोक गुण्या-गोविंदाने रहातात. फक्त निधी समाजाला देऊन आमचा उध्दार होणार नसून समाजासाठी ठोस भूमिका स्पष्ट करावी. आणि संबधित लोकांना याचा जाब विचारावा. या संबधी महाराष्ट्र ख्रिस्ती विकास परिषद अल्पसंख्याक सिंधुदूर्ग जिल्हयाच्या प्रमूख पदाधिकारीची विचार विनिमय करून पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते कार्मिस आल्मेडा यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.
Post a Comment
0 Comments