विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला कणकवली शिवसेना शहरप्रमुख प्रमोदशेठ मसूरकरांचा तडकाफडकी राजीनामा
निवडणुकीच्या आदल्या दिवशी राजीनामा दिल्याने शिवसेना शिंदे गटात खळबळ
नवप्रभात NEWS / कणकवली
पक्षाचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपनेते यांच्याकडे प्रमोदशेठ मसूरकर यांनी दिला राजीनामा
कणकवली शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी आपला कणकवली शहर प्रमुख पदाचा राजीनामा पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे कणकवली मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाला हा धक्का मानला जात आहे. काही वर्षांपूर्वी प्रमोदशेठ मसूरकर यांनी शिवसेना ठाकरे गटामधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर व उपनेते संजय आंग्रे यांच्याकडे या राजीनाम्याची प्रत दिल्याचे मसूरकर यांनी म्हटले आहे. माझ्या वैयक्तिक कारनामुळे मला काम करणे शक्य होत नसल्याने राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Post a Comment
0 Comments