Type Here to Get Search Results !

जनार्दन (समीर) कुडाळकर यांचे भाजप पक्षातून निलंबन

जनार्दन (समीर) कुडाळकर यांचे भाजप पक्षातून निलंबन

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्जले भारतीय जनता पार्टीचे मंडल चिटणीस जनार्दन (समीर) कुडाळकर यांचे पक्षातून निलंबन करण्यात आल्याचे पत्र भाजपाचे तालुकाध्यक्ष सुहास गावंढळकर यांनी दिले आहे

समीर कुडाळकर यांना दिलेल्या पत्रात भारतीय जनता पार्टी ही संघटना आपल्या शिस्तबद्ध कार्यप्रणाली साठी परिचीत आहे. या संघटनेमध्ये पक्षाचा आदेश हा अत्यंत महत्वाचा आणि प्रत्येक कार्यकत्यांसाठी बंधनकारक मानला जातो. आपल्याकडे भारतीय जनता पार्टी मंडल चिटणीस या प्रमुख पदाची अशी जबाबदारी असताना आपण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार यांचा प्रचार न करता आपण पक्षविरोधी काम करत असल्याचे दिसून येत आहे. तरी ही बाब पक्षशिस्तीच्या विरोधी आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या मंडल चिटणीस या पदावरून आपले निलंबन करण्यात येत आहे. तसेच आपले भाजपा प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात येत असून यापुढे आपण आपल्या प्रचार किंवा अन्य बाबीसाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे पक्षाचे नाव, पद, आणि पक्षाच्या नेत्याची नावे किंवा फोटो वापरू नये असे बजावण्यात येत आहे असे झाल्यास आपल्यावर कारवाई करण्यात येईल बाची नोंद घ्यावी असे म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments