Type Here to Get Search Results !

जिल्हा रूग्णालय ओरोस रक्तपेढी कर्मचाऱ्यांकडून रक्तदान..

जिल्हा रूग्णालय ओरोस रक्तपेढी कर्मचाऱ्यांकडून  रक्तदान..

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

सिधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बँक मध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत पुढील दोन दिवस पुरू शकेल, एवढाच रक्तसाठा शिल्लक असुन
विधानसभा निवडणुका व दिवाळी सण यामुळे ही परिस्थिती उद्भवली असून ती तशीच राहिली, तर येत्या तीन-चार दिवसांत ब्लड बँकेतील सर्व रक्तसाठा संपण्याची होण्याची भीती व्यक्त होत असताना 
जिल्हा रुग्णालय ओरोस येथील रक्तपेढी मधील कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासत एक वेगळा आदर्श निर्माण केला 
 या रक्तदान शिबीरात
 श्री साई सावंत, श्री सुरेश डोंगरे, श्री प्रथमेश खाडी श्री मिलिंद कांबळे यांनी रक्तदान करत सहकार्य केले.
गणेशोत्सव, दिवाळी आदी सण काळात जिल्ह्यात रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली त्यातच. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून गावागावातील कार्यकर्ते प्रचारात गुंतले आहेत. आचारसंहिता असल्याने अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या  कार्यक्रमानाही थोडा चाप बसताना दिसतो.परिणामी सध्या जिल्ह्यात रक्तदान शिबिरांची संख्या अतिशय कमी झाली आहे. 
 जिल्ह्यात तापसरीचे, प्लेटलेट्स कमी होणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. सध्याही जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये तापसरीचे रुग्ण मोठ्या संख्येने दाखल आहेत. विविध रुग्णालयांकडून, रुग्णांच्या नातेवाईकांकडून मिळून दिवसाला १५ ते २० रक्तपिशव्या नेल्या जात आहेत. साहजिकच उपलब्ध रक्तसाठा झपाट्याने संपत चालला असताना जिल्हा रूग्णालयाच्या ओरोस येथील कर्मचाऱ्यांनी रक्ताचा तुटवडा लक्ष्यात घेत केलेले रक्तदानमुळे या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बँकेतील झपाट्याने कमी होत असलेला रक्तसाठा लक्षात घेऊन आता रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. कारण, ही स्थिती अशीच राहिली, तर रक्ताविना रुग्ण उपचारापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
 त्यामुळे रक्तदाते, रक्तदान शिबिरे आयोजित करणाऱ्या संस्था, मंडळे यांनी ब्लड बँकेशी तात्काळ संपर्क साधून रक्तसाठा वाढविण्यासाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हा रुग्णालयाकडून  केले जात आहे.

Post a Comment

0 Comments