Type Here to Get Search Results !

रेशनकार्डवरील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी करणे बंधनकारक; आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

रेशनकार्डवरील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी करणे बंधनकारक; आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

नवप्रभात NEWS / ओरोस 

 प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. याची अंतिम तारीख यापूर्वी ३१ ऑक्टोबर होती. परंतु आता केंद्र शासनाकडून प्रक्रियेस मुदवाढ देण्यात आली असून ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

 सरकारने काही महिन्यांपूर्वी केशरी, पांढऱ्या व पिवळ्या रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी करण्याची मार्गदर्शक तत्त्वे लागू केली होती. त्यात सर्व रेशनकार्डधारकांनी ई- केवायसी करणे अनिवार्य होते. त्यासाठी आता शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. आतापर्यंत दोन वेळेस ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

रेशन दुकानांमध्ये केली आहे सुविधा

रेशनकार्डची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर परिसरातील स्वस्त धान्य दुकानातील फोर-जी ई-पॉस मशीनने ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक टाकल्यानंतर लाभार्थ्यांचे बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

ई-केवायसी करणे बंधनकारक

प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी. तसे न केल्यास संबंधितांना धान्य वितरण सेवेचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments