Type Here to Get Search Results !

वेंगुर्ला शहरात मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रमाचे आयोजन

वेंगुर्ला शहरात मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रमाचे आयोजन 

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ला शहरात नगरपरिषदेतर्फे मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम संपन्न 
  मा. भारत निवडणूक आयोग, नवी  दिल्‍ली यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्‍या कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. सदर कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने मा. जिल्‍हाधिकारी व जिल्‍हा निवडणूक अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी स्‍वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती व मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्‍याबाबत सूचना दिलेल्‍या आहेत. त्‍याअनुषंगाने वेंगुर्ला शहरात नगरपरिषदेतर्फे मतदार जनजागृती अंतर्गत शहरात या आठवडयात दिनांक ९ नोव्हेंबर रोजी बंदररोड गणपती मंदिर नजिक, व ११नोव्हेबर रोजी कलानगर चॅपेल येथे मतदार जागृती आणि सहभाग कार्यक्रमा अंतर्गत बचतगटातील महिला मार्फत कोणत्‍याही अमिषांना बळी  न पडता कोणाच्‍या प्रभावाखाली न येता निर्भय पणे मतदान करण्‍याची शपथ घेण्‍यात आली. या सर्व कार्यक्रमाला बचतगटातील महिला व इतर महिलांनी चांगला प्रतिसाद दिला.  
या मतदार जनजागृतीपर शपथ कार्यक्रम घेताना मा. मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी दि. २० नोव्‍हेंबर, २०२४ रोजी मतदानाचा हक्‍क बजावावा असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments