Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले शहरात मतदार जनजागृती अंतर्गत लोकशाही दिडींचे आयोजन


वेंगुर्ले शहरात मतदार जनजागृतीअंतर्गत लोकशाही दिडींचे आयोजन 

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

  मा. भारत निवडणूक आयोग, नवी  दिल्‍ली यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्‍या कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. सदर कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने मा. जिल्‍हाधिकारी व जिल्‍हा निवडणूक अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी स्‍वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती व मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्‍याबाबत सूचना दिलेल्‍या आहेत.  त्‍याअनुषंगाने वेंगुर्ला शहरात नगरपरिषदेतर्फे मतदार जनजागृतीअंतर्गत वेंगुर्ला  शहरातील महिला बचत गटामार्फत कलानगर, जुना स्‍टॅण्‍ड, विठ्ठलवाडी, दाभोसवाडा, गावडेवाडी, या मार्ग रॅली आयोजित करण्‍यात आली होती. सदर रॅलीत पालखीमध्‍ये संविधान ठेवून संविधानाचे महत्‍व अबाधित रहावे. मतदानाचा हक्‍क बजावावा यासाठी टाळ गजराच्‍या घोषात पारंपारीक पध्‍दतीने मतदार जनजागृती करण्यात आली.
या दिंडीमध्‍ये फातिमा, दुर्वा, अंकुर, नम्रता, श्रीगणेश, श्री देव नारायण, दयासागर, वेलांकनी, गोल्‍डन, गुरुमाऊली, सेंट अॅन्‍थोनी नवोदय, एकादशी, समर्थ, मनस्‍वी या महिला बचत गटातील ७४ महिलांनी सहभाग दर्शविला. त्‍याचप्रमाणे मतदार सेल्‍फी पॉईट, मतदार हस्‍ताक्षर अभियान व मतदार जनजागृती शपथ कार्यक्रम मार्केट आवार, दाभोली नाका, पिराचा दर्गा, झुलता पुल, बंदर, एस. टी. स्‍टॅण्‍ड,  हॉस्पिटल नाका, त्रिवेणी गार्डन, घोडेबांव गार्डन, पवनपुत्र भाजी मंडई इत्‍यादी ठिकाणी आयोजन करण्‍यात आले आहेत.
या लोकशाही दिंडीला शुभेच्‍छा देताना मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी दि. २० नोव्‍हेंबर, २०२४ रोजी मतदानाचा हक्‍क बजावावा असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments