Type Here to Get Search Results !

वैभव नाईक यांना निवडुन देणार हा कुडाळ वासियांचा निश्चय- नगरसेवक संतोष शिरसाट

वैभव नाईक यांना निवडुन देणार हा कुडाळ वासियांचा निश्चय- नगरसेवक संतोष शिरसाट

   मनोज देसाई 
नवप्रभात NEWS 
         
 आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ शहरासाठी  कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली मात्र राणे यांच्या हातात सत्ता असताना त्यांना ते जमल नाही म्हणुनच आमदार वैभव नाईक हे तिसऱ्यांदा आमदार व्हावेत ही कुडाळवासीयांची प्रामाणिक इच्छा आहे असे परखड मत कुडाळ शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष शिरसाट यांनी व्यक्त केले                                         -
 शिरसाट म्हणाले की मा.विद्यमान खासदार नारायण राणे पंचवीस वर्षे मुख्यमंत्री, महसुलमंत्री, दुग्ध विकास मंत्री, पालकमंत्री, केंद्रीय सुष्मलघु मंत्री असताना कुडाळ शहरातील प्रलंबित प्रश्न त्यांना दीसले नाहीत त्याच बरोबर कुडाळ शहर ग्रामपंचायत,नंतर कुडाळ शहर नगरपंचायत वर त्यांची सत्ता असताना काही करु शकले नाही असे सांगत  शिरसाट म्हणाले राणेंचे पुत्र आणि आताचे शिंदे शिवसेना प्रवेश कर्ते झालेले निलेश राणे पाच वर्षे खासदार होते असे असताना त्यांनाही कुडाळ शहरातील विकासकामे दिसली नाहीत परंतु आमदार वैभव नाईक यांनी भंगसाळ नदी बंधारा बांधुन देऊन कुडाळ शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटवला, भंडारी समाजाचे भवन देणारे त्यावेळचे माजी पदाधिकारी आणि आता शिंदे गटाचे मंत्री यांनी आश्वासन दीले मात्र आमदार श्री नाईक यांनी भंडारी समाजाचे भुषण असलेले कै मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृह बांधले आणि कुडाळ शहरवासीयांना नाट्यगृहाची व्यवस्था करुन दीली, कुडाळ बसस्थानकाची अवस्था आम्ही लहान पणापासून बघत होतो परंतु आमदार वैभव नाईक यांनीच कुडाळ बसस्थानक देखणे बांधले, ऐतिहासिक घोडेबाव बांधली, कुडाळ शहारातील सुसज्ज क्रिंडांगण, ( क्रिकेट ग्राउंड )बॅडमिंटनपटूंसाठी व्यवस्था, नगरपंचायतीच्या माध्यमातून सुसज्ज गार्डन, गणेश घाट, अशी कोट्यावधी रुपयांची कामे करुन कुडाळ वासीयांचे आशिर्वाद घेऊन कामे करत असताना आपण सुचवलेली कामे कुडाळ शहरातील अपुर्ण रहाता नये याची दक्षता घेत वेळ प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेटही घेत होते त्यावर विरोधी नी टिका पण केली पण शहराच्या विकासासाठी टिकेला भिक घातली नाही .आणि कुडाळ शहराचा कायापालट करताना कुडाळ वासीयांना सोबत घेत आरोग्याचा प्रश्न सुटावा यासाठी महीला रुग्णालय सुसज्ज बांधुन आज गोरगरीबांच्या आरोग्याचा प्रश्न आम . नाईक यांनी सोडवला तसेच कुडाळ शहरात मारूती मंदीर येथे भक्त निवास साठी एक कोटी रुपये व कुडाळेश्वर मंदीर साठी तिन कोटी रुपये मंजुर करून घेतले व कुडाळ भंगसाळ नदीचे सुशोभीकरण यासाठी सुध्या निधी आणलाय ते पण लवकरच पुर्ण होईल . व कुडाळच्या जनतेला शांत संयमी सर्व लोकांत मिसळणारा व कुणालाही त्रास न होणारा आमदार पाहिजे आहे .त्यामुळे पुन्हा एकदा तिस-यांदा आमदार वैभव नाईक निवडुन देणार हे कुडाळ वासियांनी निश्चय केल्याचे श्री शिरसाट यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments