Type Here to Get Search Results !

सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघातील 17 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सील....



सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघातील 17 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सील....
नवप्रभात NEWS / ओरोस 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदानासाठी मतदारांचा उत्साह जाणवत होता. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे 62 टक्के पर्यंत मतदान झाले. 
मतदान हा लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करण्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच आवाहन व राजकीय पक्षानी नोकरी व शिक्षणासाठी परगावी असलेल्या मतदारांना आणण्यासाठी केलेल्या रचनेमुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघातील 17 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सील बद्द झाले.

या निवडणुकीसाठी आज बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांततेत मतदान संपन्न झाले. सकाळी सात वाजल्यापासूनच जिल्ह्यात सगळीकडे मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. यामुळे यावेळी हा मतदाराचा आकडा वाढला असून, तब्बल 62 टक्के एवढे मतदान झाले आहे. यावेळी मुंबई, पुणे तसेच गोवा येथून मोठ्या प्रमाणात मतदार आल्याने हा टक्का वाढण्यामध्ये भर पडली आहे. त्याचबरोबर प्रशासनाने मतदाराची टक्केवारी वाडावी यासाठी प्रयत्न केले होते. जिल्ह्यात दिवसभरात शांततेत मतदान झाले. काही ठिकाणी मशीन बंद होण्याचा प्रकार झाला होता मात्र तात्काळ या मशीन सुरू करण्यात आल्याने मोठा गोंधळ झाला नाही. बुधवारी मतदारांनी आपलं मत मतदार यंत्रामध्ये बंद केलं असून आता मतदारांनी कुणाला आपला कौल दिला आहे हे 23 तारीख ला निश्चित होईल.
महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी बुधवारी मतदान झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण तीन मतदारसंघ असून या तीनही मतदार संघात शांततेत आणि सुरळीत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलीस विभागाने हे मतदान शांत संपन्न व्हावे यासाठी केलेले प्रयत्न सार्थकी ठरल्याचे दिसून आले. जिल्ह्यात सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सुरुवात केली होती सकाळच्या वेळात सगळ्याच मतदान केंद्रांवर रांगाच्या रांगा दिसून येत होत्या.

गोवा शासनाने दिली शासकीय सुट्टी.

महाराष्ट्रात मतदान होत असले तरीही महाराष्ट्राच्या सीमा वरती भागातील मोठ्या प्रमाणात मतदार हे गोवा राज्यामध्ये नोकरी व्यवसायानिमित्त जात असतात या सर्वांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गोवा शासनाने महाराष्ट्रातील सर्वांना बुधवारी भर पगारी रजा जाहीर केली होती यामुळे गोव्यात नोकरीनिमित्त जाणारे सर्व नोकरदार यांना मतदान करता आले.

मुंबई पुण्याहून आले मतदार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरेच लोक हे मुंबई पुणे कोल्हापूर आदी भागांमध्ये नोकरी किंवा व्यवसाय निमित्त राहतात त्याचबरोबर कित्येक तरुण शिक्षणासाठी या शहरांमध्ये वास्तव्यास आहेत पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी मतदान असल्याने पूर्ण महाराष्ट्रभर मतदानासाठी शासकीय सुट्टी जाहीर झाली होती याचा फायदा या सर्व मतदारांना झाला आणि हे मतदार मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग झाले होते त्यामुळे त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला.
जिल्ह्यात सकाळी सात ते दुपारी 11 या वेळेपर्यंत एकूण 23.2% एवढे मतदान झाले आहे. यामध्ये सर्वात अधिक कुडाळ विधानसभा मतदारसंघात 25.47%, कणकवली मतदारसंघात 21.22% तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 22.53% एवढे मतदान झाले आहे कणकवली मतदारसंघात आत्तापर्यंत 27 हजार 665 पुरुष 210हजार पाचशे स्त्री मिळून एकूण 49 हजार 165 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर कुडाळ मतदार संघात 31 हजार 37 पुरुष आणि 24 हजार 288 स्त्री मिळून एकूण 55 हजार 325 लोकांनी तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 29 हजार 440 पुरुष आणि 22 हजार 378 स्त्री मिळून एकूण 51 हजार 818 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 1 लाख 56 हजार 308 येवढ्या मतदारांनी जिल्ह्यात आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे.

जिल्ह्यात दुपारी एक वाजेपर्यंत 42.21% येवढे मतदान.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी सात ते दुपारी 1 या वेळेपर्यंत एकूण 42.21% एवढे रुप्तदान झाले आहे. यामध्ये सर्वात अधिक कणकवली विधानसभा मतदारसंघात 45.11%, कुडाळ मतदारसंघात 42.26% तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 39.24% एवढे मतदान झाले आहे कणकवली मतदारसंघात आत्तापर्यंत 53 हजार 920 पुरुष 50 हजार 615 स्त्री मिळून एकूण 1 लाख 4 हजार 535 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तर कुडाळ मतदार संघात 47 हजार 801 पुरुष आणि 43 हजार 989 स्त्री मिळून एकूण 91 हजार 790 लोकांनी तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 46 हजार 428 पुरुष आणि 43 हजार 816 स्त्री मिळून एकूण 90 हजार 244 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 2 लाख 86 हजार 569 येवढ्या मतदारांनी जिल्ह्यात आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे.
जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 55.31% येवढे मतदान.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी सात ते दुपारी 1 या वेळेपर्यंत एकूण 55.31% एवढे मतदान झाले आहे. यामध्ये सर्वात अधिक कणकवली विधानसभा मतदारसंघात 57.03%, कुडाळ मतदारसंघात 55.99% तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 52.95% एवढे मतदान झाले आहे कणकवली मतदारसंघात आत्तापर्यंत 67 हजार 915 पुरुष 64 हजार 235 स्त्री मिळून एकूण 1 लाख 32 हजार 150 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे .तर कुडाळ मतदार संघात 62 हजार 782 पुरुष आणि 58 हजार 814 स्त्री मिळून एकूण 1 लाख 21 हजार 596 लोकांनी तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 61 हजार 848 पुरुष आणि 59 हजार 947 स्त्री मिळून एकूण 1 लाख 21 हजार 795 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 3 लाख 75 हजार 541 येवढ्या मतदारांनी जिल्ह्यात आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे.

जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 67.60% येवढे मतदान.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी सात ते दुपारी 5 या वेळेपर्यंत एकूण 67.60% एवढे मतदान झाले आहे. यामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघात 67.46%, कुडाळ मतदारसंघात 68.85% तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 66.56% एवढे मतदान झाले आहे कणकवली मतदारसंघात आत्तापर्यंत 79 हजार 907 पुरुष 76 हजार 421 स्त्री मिळून एकूण 1 लाख 56 हजार 328 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर कुडाळ मतदार संघात 76 हजार 631 पुरुष आणि 72 हजार 905 स्त्री मिळून एकूण 1 लाख 49 हजार 536 लोकांनी तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 77 हजार 770 पुरुष आणि 75 हजार 321 स्त्री मिळून एकूण 1 लाख 53 हजार 091 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 4 लाख 58 हजार 955 येवढ्या मतदारांनी जिल्ह्यात आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे

Post a Comment

0 Comments