शहीद जवानांच्या पत्नींना हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन
ओरोस
नवप्रभात NEWS
सिंधुदुर्गनगरी सुवर्ण महोत्सवी योजनेंतर्गत अनुदान घेणाऱ्या शहीद जवानांच्या पत्नी यांनी दरवर्षीप्रमाणे त्या हयात असल्याबाबतचा दाखला संबंधित बैंक, सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून सही व शिक्यासह प्राप्त करुन घेऊन त्यासोबत माजी सैनिक विधवा पत्नी ओळखपत्र, बँक पासबुकच्या छायांकित प्रतीसह या कार्यालयात २० नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सात शहीद जवानांच्या पत्नी यांना सुवर्ण
महोत्सवी योजनेंतर्गत जिल्हा सैनिक कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडून दरमहा अनुदान अदा करण्यात येते. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक सहा महिन्याने ३१ मे व ३० नोव्हेंबर रोजी हयातीचे दाखले घेऊनच अनुदान अदा करण्याचे निर्देश आहेत. हयातीचे दाखले दिलेल्या मुदतीत या कार्यालयास प्राप्त न झाल्यास १ डिसेंबरपासून त्यांचे मासिक अनुदान दाखला प्राप्त होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात येईल, यांची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०२३६२-२२८८२० वर संपर्क करावा.
Post a Comment
0 Comments