पिंगळी तिठ्यावर ग्रामपंचायत इकडून दोन बस थांबायची व्यवस्था
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
कुडाळ-वेंगुर्ले या रहदारीच्या मुख्य रस्त्यावरील पिंगुळी तिट्ठा हा नेहमीच गजबजलेला असतो. येथे पाच रस्त्यांचा तिठा आहे.
सदर रस्त्यावरील एस.टी.बस थांबे वडाखाली गणपती मंदिर येथे असल्याने, वाहतूक कोंडी होत होती. याचा विचार करून पिंगुळी ग्राम पंचायतीने एस.टी.प्रवाशांसाठी कुडाळच्या बाजुने विजयालक्ष्मी गारमेंटच्या समोर,तर वेंगुर्लेच्या बाजुने डॉ. राणेंच्या क्लिनीक समोर बस थांब्याची व्यवस्था केली आहे.
सदर स्तृत्य निर्णयामुळे, पिंगुळी तिट्ठया वरील वाहतूक कोंडी च्या समस्येवर काही प्रमाणात उपाय झाला आहे.
मात्र, कुडाळच्या बाजुकडील थांब्यावर उन्हापासून प्रवासी शेड उभारणे आवश्यक आहे. या बस थांब्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पिंगुळी सरपंच श्री.अजय आकेरकर यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments