नवीन मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील का ?
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
महाराष्ट्र राज्य विधानसभा 20२४ निवडणुकीची घोषणा झाली. आणि , सर्व पक्षांनी आपली कंबर कसायला सुरूवात केली.
निवडणुक आयोगाच्या मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी महाराष्ट्रात, 'एक राज्य -एक निवडणूक' हे सुत्र अवलंबुन २० नोव्हेंबर रोजी २८८ आमदार (M.L.A.) निवडणुका जाहीर केल्या.
यावेळी महाराष्ट्रातील काही , 'मिनी मंत्रालय' म्हणून ऒळखल्या जाणा-या जिल्हा परिषद सदस्य निवडणूका खोळंबल्या आहेत. त्या प्रलंबित निवडणुका याच विधानसभेच्या बरोबरच घेतल्या जातील असे वाटत होते.मात्र, आयोगाने याविषयी 'चकार' शब्दही काढला नाही.
आरक्षणाच्या मुद्द्यावर सदर निवडणूका स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपुन बराच कालावधी लोटला आहे.
आता त्या , पुढच्या वर्षी नवीन मंत्रीमंडळाच्या स्थापनेनंतर बहुदा घेण्यात येतील.
जर , त्या यावेळी एकत्रित घेतल्या असत्या तर, मात्र समिकरणे बदलली असती.
आता नवीन मंत्रीमंडळाच्या पक्षांना मात्र, त्याचा फायदा होईल यात शंका नाही.
मात्र सदर निवडणूकांकडे डोळे लावून बसलेल्या,
इच्छुक उमेदवारांची मात्र यावेळीही निराशा झाली आहे. त्यामुळे नवीन मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Post a Comment
0 Comments