सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना कोकण विकास संस्थेचा यावर्षीचा सहकार "कोकण रत्न" हा पुरस्कार जाहीर
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत दिली. तर कला क्षेत्रातील कोकण रत्न पुरस्कार, हास्य जत्रा फेम कलाकार ओंकार भोजने यांना जाहीर करण्यात आला आहे. मुंबईत आयोजित एका भव्य सोहळ्यात त्यांना बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, हिरवळ ग्रुपचे अध्यक्ष किशोर धारिया, लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका सौ. रेणुताई दांडेकर आणि कोकण संस्थेचे अध्यक्ष कुबल या मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
श्री. दळवी यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद स्विकारल्यानंतर त्यांनी ग्राहक हित लक्षात घेऊन बँकेची सेवा अधिक जलद व गतिमान केली आहे. ही शेतकऱ्यांची बँक असल्याने शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय सुरु करण्यासाठी विविध योजना अंमलात आणत त्यांना वित्तीय सहकार्य केले. यामुळे येथील शेतकरी खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम झाला. त्यांचा सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ओळखून त्यांच्यासाठी काम केले आहे. याची दखल घेवून त्यांना गौरविण्यात येणार आहे.
Post a Comment
0 Comments