काका व वडिलांसोबत गणपतीच्या चित्र शाळेमध्ये मातीमध्ये खेळता खेळता त्याने साकारल्या सुबक व आकर्षक मुर्त्या...
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
कुडाळ तालुक्यातील तेंडोली आवेरे यांसारख्या खेडेगावात राहणाऱ्या व लहानपणीच बापाचे छत्र हरपलेल्या कु संकेत गोविंद आसोलकर याने लहानपणी त्याचे काका नंदकिशोर आसोलकर व वडील गोविंद आसोलकर हे गणपतीच्या मूर्ती साकारताना यांच्या सोबत संकेतने मातीमध्ये खेळत खेळत गणपतीसह विविध मुर्त्या साकारण्याची कला अवगत केली.
संकेत लहान असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले त्याने शाळा शिकता शिकताच आपल्या मूर्ती साकारण्याच्या कलेकडे अधिक लक्ष देत गणपतीसह विविध मुर्त्या हुबेहूब साकारू लागला आहे.
आत्ताच त्याने श्रीदेवी शारदेची मूर्ती अतिशय सुंदर प्रकारे साकारून आपल्या मूर्ती साकारण्याच्या कलेकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
त्यांनी साकारलेल्या श्री शारदा देवीच्या मूर्तीचे तेंडोली आवेरा शाळेमध्ये आज पूजन करण्यात आले आहे.
कामानिमित्त मुंबईमध्ये गेलेल्या संकेतने मुंबई सायन येथील विशाल शिंदे यांच्या गणेश चित्र शाळेमध्ये मुर्त्या साकारण्याचे काम हाती घेतले असून त्या ठिकाणी त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तो गणपतीच्या सिझन मध्ये गावी येऊन गणपती करतो.
लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेल्या कु.संकेत गोविंद आसोलकर या मुलाला समाजाकडून प्रोत्साहन मिळाल्यास कलाक्षेत्रात तो आपल्या गावासह कोकणचे नाव निश्चितच पुढे नेईल....
आसोलकर आर्ट्स
संकेत आसोलकर,आवेरे
9307840217
Post a Comment
0 Comments