महाराष्ट्र राज्यात ८७ मतदारसंघ संवेदनशील
नवप्रभात NEWS / मुंबई
राज्यातील ८७ मतदारसंघ संवेदनशील असल्याचे निवडणूक आयोगान म्हटले असून मुंबईतील ६ , कोकणातील १० , पश्चिम महाराष्ट्रातील १८ , उत्तर महाराष्ट्रातील १४ , विदर्भातील १७ तर मराठवाड्यातील १५ मतदारसंघ संवेदनशील जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल,कर्जत आणि उरण या तीन मतदार संघाचा समावेश आहे.सर्व संवेदनशील मतदार संघात सशस्त्र पोलीस दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत.
रायगडातील तीन मतदार संघांसह कोकणात सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी, कणकवली आणि पालघर, डहाणू, वसई, ठाण्यात भिवंडी पूर्व, मुरबाड, उल्हासनगर, डोंबिवली, ओवळा माजीवडा, ऐरोली, बेलापूर, ठाणे शहर. मुंबईत वांद्रे पूर्व कुर्ला, भांडुप पश्चिम, माहीम, मुंंबादेवी, कुलाबा हे मतदारसंघ संवेदनशील आहेत.
उर्वरित संवेदनशील मतदार संघात पश्चित महाराष्ट्रात सोलापूरमध्ये सोलापूर शहर, उत्तर माळशिरस, पुण्यामध्ये खेड, आळंदी, शिरूर, दौंड, बारामती, मावळ, चिंचवड, पिंपरी वडगाव, वडगाव शेरी, शिवाजीनगर, पर्वती हडपसर आणि पुणे कॅन्टोमेंट.
कोल्हापूरमध्ये चंदगड, कोल्हापूर उत्तर, शिरोळ आणि सांगली, सांगली शहर हे मतदारसंघ संवेदनशील आहेत. नाशिक विभागात बागलान, कळवण, दिंडोरी, नाशिक मध्य, इगतपुरी.धुळ्यामध्ये साकी, धुळे शहर, शिरपूर, जळगावमध्ये चोपडा, जळगाव शहर, रावेर.नंदुरबारमध्ये अक्कलबुवा, शहादा, नंदूरबार, नवापूर.बुलढाण्यात मलकापूर, चिखली, बुलढाणा.वर्ध्यामध्ये वर्धा ,नागपूरमध्ये हिंगणा, नागपूर पूर्व, नागपूर मध्य.भंडार्यामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, गडचिरोली, चंद्रपूर, बल्लापूर.यवतमाळमध्ये आर्णि, नांदेडमध्ये किनवट, भोकर आणि डेगलूर, परभणीत जिंतूर, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुलंब्री, संभाजीनगर मध्य आणि गंगापूर, लातूरमध्ये नीलंगा, अवसा, धाराशीव, उमरगा.
अहिल्यानगरमध्ये संगमनेरनगर शहर असे मतदारसंघ संवेदनशील मतदार संघ म्हणून घोषित करण्यात आले आहेत. संवेदनशील मतदारसंघ हे प्रमुख नेत्यांची उमेदवारी असलेले आहेत.
संवेदनशील मतदार संघावरती निवडणूक आयोग विशेष लक्ष ठेवणार आहे. कोकणात संवेदनशील मतदारसंघात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा सावंतवाडी, नितेश राणेंचा कणकवली, ठाण्यात मुस्लीमबहुल असलेला भिवंडी पूर्व असे मतदार संघ आहेत.
Post a Comment
0 Comments