राष्ट्रीय शुटिंगबॉल खेळाडू विद्याधर जामसंडेकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
नवप्रभात NEWS / मुंबई
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड शिरगांवचे सुपुत्र व मुंबईचे राष्ट्रीय शुटिंगबॉल खेळाडू श्री विद्याधर जामसंडेकर हे आपल्या ३३ वर्षाच्या प्रधिर्घ सेवेनंतर मुंबई महानगरपालिकामधून फोरमन पदावरुन नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
विद्याधर यांनी आपले प्राथमिक प्रारंभिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण शिरगांव हायस्कूल शिरगांव, देवगड येथून पूर्ण केल्यावर ते मु़बईत आले. शिरगांव हे राष्ट्रीय स्तरावर शुटिंगबॉल स्पर्धांचे आयोजन करणार्या शुटिंगबॉल दिवान्या मा. श्री. संजय कदम यांचे गांव. त्यात मुळात शुटिंगबॉल खेळाची आवड असलेल्या जामसंडेकर ह्यानी मुंबईत आल्यावर ललित कला भवन वरळी येथून शुटिंगबॉल खेळायला सुरुवात केली तिथे त्याना जेष्ठ शुटिंगबॉल खेळाडू व फेडरेशन रेफरी अशोक दाभोलकर व बाबू आचरेकर ह्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
आपले आय.टी.आय. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्याना मुंबई मनपामध्ये नोकरी लागली व मुंबई मनपा शुटिंगबॉल संघाकडून त्यानी २०+ अखिल भारतीय स्पर्धा तसेच ०६ राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा बहुमान मिळवला. दोन वेळा मुंबईच्या अंडर-१८ संघाचे राष्ट्रीय स्पर्धेत प्रशिक्षकपद भुषविले. मुंबई शुटिंगबॉल संघटनेनचे सचिव श्री. दिपक सावंत ह्याच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्यानी मुंबई कार्यकारणी सदस्यपदही भुषविले. त्यानंतर मुंबई मनपाचे व्यवस्थापक व प्रशिक्षकपद भुषविताना त्यानी स्थानिक खेळाडूना मार्गदर्शनही केले.
आज त्यांचा सत्कार असि. इंजिनियर श्री. माजीद साहेबांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच अन्य मान्यवरांकडूनही श्री. जामसंडेकर ह्याना विविध भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले तसेच श्री. अशोक दाभोलकर ह्यानी दाभोलीतील आंतरराष्ट्रीय चित्रकार मा. श्री. अरुण दाभोलकरसरानी चितारलेली गणेश चित्रफ्रेम श्री. विद्याधर जामसंडेकर ह्याना भेट दिली.
जामसंडेकर ह्याना गुरुस्थानी असलेले श्री अशोक दाभोलकर ह्याना श्री माजिदसाहेबांच्या हस्ते गौरविण्यात आले. सौ. जामसंडेकर तसेच मुलगी शिवसेना युवती शाखाप्रमुख सिध्दी तसेच मुलगा हयानाही व्यासपिठावर सन्मानित करण्यात आले.
ह्यावेळी व्यासपिठावर असि. इंजिनियर मा. सर्वश्री. माजिद साहेब, सहा. इंजिनियर श्री. इंद्रजित जाधवसाहेब, टाईमकिपर श्री. भारमलसाहेब, साटमसाहेब, जेष्ठ खेळाडू व फेडरेशन रेफरी श्री. अशोक दाभोलकर, सौ. जामसंडेकर आदी उपस्थित होते तसेच राष्ट्रीय खेळाडू ऐयाज शेख, हरिचंद्र पाटील, हेमंत कांबळे, तुषार म्हात्रे, सुमित पाटील, बबन कांबळे तसेच
मनपा वरळी युनिटचे सर्वश्री सचिन नारायणे, लोपेस कोलोसो, रिचर्ड कोरीया आदी सहकारी पर्यवेक्षक व कर्मचारी उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सर्वश्री देवेन्द्र साटम व दिगंबर डावकर ह्यानी केले.
Post a Comment
0 Comments