विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतर्फे कळणे हायस्कूल येथे बहू उद्देशीय कार्यक्रम संपन्न
दोडामार्ग
नवप्रभात NEWS
दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील नूतन विद्यालयात विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्यावतीने शालेय मुलांसाठी आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता, सतर्कता अभियान आणि राष्ट्रीय स्वच्छता मोहीम असा बहुउद्देशीय कार्यक्रम घेण्यात आला.
केंद्र शासनाच्या धोरणानुसार राष्ट्र निर्माण करणारी पुढती पिढी ही शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता यांच्याही पूर्ण परिचित असली पाहिजे या उद्देशाने इयत्ता आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना बैंक क्षेत्रीय प्रबंधक श्री. बी. पी. सामंत यानी मार्गदर्शन केले. सोबतच केंद्रीय सतर्कता आयोग, भ्रष्टाचार मुक्त भारत, नागरिकांची कर्तव्ये याबाबत विस्तृत माहिती दिली.
इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्याध्यांना २ ऑक्टोबर गांधी जयंती दिनापासून सुरू झालेल्या स्वच्छता मिशन ०४ या मोहिमेत वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता याविषयी माहिती दिली. कार्यक्रमात सर्व विद्यार्थाना स्वच्छतेची शपथ दिली. शपथ कार्यक्रमात मुलासोबत प्रशालेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित असलेले बैंक अधिकारी यांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. महेंद्र राऊळ, श्री. नितीन देसाई श्री. उमेश देसाई आणि अन्य कर्मचारी तर बँकेच्या वतीने कणकवली शाखा प्रबंधक श्री. रॉड्रिग्ज, कळणे शाखा प्रबंधक श्री. पाटील, तळकट शाखा प्रबंधक श्री. सकपाळ इत्यादि उपस्थित होते. प्रशालेतर्फे स्वागत श्री. नितीन देसाई सर तर आभारप्रदर्शन श्री. उमेश देसाई सर यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी श्री, गणपत उर्फ भाई देसाई यांनी सहकार्य केले.
Post a Comment
0 Comments