मनोज देसाई
नवप्रभात NEWS
नवरात्र - दसरा मागे पडला असुन , शेतातील भातपिक कापणीला आले आहे.मात्र
मधल्या काळात, परतीच्या पावसाच्या धुमाकूळाने भातकापणी लांबणीवर पडले होते.
हळवे भात पिक कापणीला पुर्ण झाले आहे. तालुक्यातील भातकापणीला मात्र आता सुरूवात झाली आहे.
दिवाळी तोंडावर आली आहे.तर महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या गडबडीत शेतकरी मात्र, विळी-कोयती हातात घेऊन भातकापणीला सज्ज झाला आहे.
यंदा सुरवंटांचे प्रमाण वाढले आहे. परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी भात पिकाचे नुकसान झाले आहे.
मात्र, प्रशासन निवडणुक कर्तव्यात गुंतले असल्यामुळे, पंचनाम्याला विलंब होत आहे.
ऑक्टोबर हीट मुळे दुपारच्या उन्हात काम करताना, शेतकऱ्यांना त्रास होत आहे.
पावसावरच पुढील कापणीचा कालावधी ठरणार आहे.
Post a Comment
0 Comments