Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले येथील मठ सतये येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात सापडलेल्या "पिसोरी" या वन्य प्राण्याची स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाने सुटका करत उपचार करून सोडले नैसर्गिक अधिवासात


वेंगुर्ले येथील मठ सतये येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात सापडलेल्या "पिसोरी" या वन्य प्राण्याची स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाने सुटका करत उपचार करून सोडले नैसर्गिक अधिवासात

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले तालुक्यातील मठ सतये  येथे आज सकाळी  वनक्षेत्रा जवळ भटक्या कुत्रांच्या हल्यात सापडलेल्या अत्यंत दुर्मिळ अशा वन्यप्राणी "पिसोरी" MOUSE DEER (अनुसूची ०१) ची सुटका स्थानिक ग्रामस्थ श्री. चंद्रशेखर गावडे व नित्यानंद शेणई यांच्या मदतीने करण्यात आली. तदनंतर श्री. सागर चव्हाण, पशुधन विकास अधिकारी वेंगुर्ला यांचेकडून सदर पिसोरीची आरोग्य तपासणी केल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सदरची बचाव मोहीम श्री. नवकिशोर रेड्डी उपवनसंरक्षक, वनविभाग सावंतवाडी डॉ.श्री. सुनील लाड, सहायक वनसंरक्षक, वनविभाग सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संदीप कुंभार, वनक्षेत्रपाल (प्रा) कुडाळ, सावळा कांबळे, वनपाल मठ. विष्णू नरळे, वनरक्षक तुळस, श्री. शंकर पाडावे, वनमजूर मठ, राहुल मयेकर, वाहनचालक यांनी यशस्वीपणे पार पाडली.
वनक्षेत्रपाल कुडाळ यांनी सहकार्य दिलेल्या ग्रामस्थांचे आभार मानून पिरोरी या वन्यप्राण्याचे अन्न साखळीतील महत्व सांगताना रेस्कू करण्यात आलेला पिसोरी हा वन्यप्राणी अत्यंत दुर्मिळ, लाजाळू असलेचे सांगून सदर प्राणी हरीण कुळातील सर्वात लहान प्राणी असलेचे सांगितले, सध्या ०१ ऑक्टोंबर ते ०७ ऑक्टोंबर या कालावधीत वन विभागामार्फत वन्यजीव सप्ताह "साजरा करणेत येतो. या सप्ताहात वन व वन्यजीव यांचे पर्यावरण दृष्ट्या असलेले महत्व व त्यांचे संवर्धनासाठी करावयाच्या कार्यात सर्व मानव जातीने सहभागी होण्यासाठी जनजागृती करण्यात येते. अशा प्रकारच्या बचाव अभियानात नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments