"इस्रो वैज्ञानिक सहली साठी" न्यू इंग्लिश स्कूल,उभादांडा विदयालयाच्या विदयार्थ्याची निवड
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
न्यू इंग्लिश स्कूल उभांदाडा विद्यालयातील इयत्ता आठवीतील कु.प्राजक्ता अनिल भोकरे व कु.मयंक मोहन नंदगडकर या दोन विद्यार्थ्यांची इस्रो वैज्ञानिक सहली साठी निवड झाली आहे.
इयत्ता सातवी मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवलेल्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची या वैज्ञानिक सहलीसाठी निवड केली जाते
यावर्षी या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाचे निवड झालेल्या विद्यार्थी कु.प्राजक्ता अनिल भोकरे आणि कु.मयंक मोहन नंदगडकर या दोन्ही प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री विरेंद्र कामत -आडारकर उपाध्यक्ष निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर, सचिव रांगोळीकार रमेश नरसुले ,सदस्य निलेश मांजरेकर आणि इतर सर्व संस्था पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती,पालक संघ यांनी केले असुन या दोन्ही विद्यार्थ्यांना या वैज्ञानिक सहलीसाठी शुभेच्छा दिल्या असून या दोन्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा नंबर १ तसेच जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा नंबर २ चे सर्व मार्गदर्शक शिक्षक त्याच बरोबर या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचे पालक यांचे ही विशेष अभिनंदन केले आहे
प्राजक्ता भोकरे आणि मयंक नंदगडकर या दोन्ही विद्यार्थ्यांचे मिळवलेल्या यशाचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे
Post a Comment
0 Comments