तुषार नाईक यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार समितीवर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने सन्मान
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
महाराष्ट्रराज्य शासनाचे लोककला अनुदान शिफारस समिती सदस्य तसेच सिंधुदुर्ग दशावतार चालक मालक बहुउद्देशीय संघाचे जिल्हाध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले येथील प्रसिद्ध नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळचे संचालक श्री तुषार (भाई) नाईक यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, बबली वांगणकर, पप्पू परब, सत्यवान पालव, नारायण गावडे व तुषार नाईक यांचे वडील बाबल नाईक हे उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments