वेताळ प्रतिष्ठान च्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
वेताळ प्रतिष्ठान चे सलग २७ वे रक्तदान शिबीर: ५८ रक्तदात्यांनी केले रक्तदान
उमेश कुंभार
नवप्रभात NEWS
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, सिद्धार्थ कलाविष्कार युवक मंडळ तुळस आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग* आयोजित वेताळ प्रतिष्ठान च्या सलग २७ व्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ५८ रक्तदात्यानी रक्तदान केले. श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस(तुळस श्री देव जैतिराश्रीत संस्था मुंबई बहुउद्देशिय सभागृह) येथे रक्तपेढी सिंधुदुर्ग च्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते नारायण नागवेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान चे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, वैधकीय अधिकारी डॉ. पवन लोखंडे, अधिपरीचारिका प्रांजली परब , प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.डॉ.सचिन परुळकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे संजय पिळनकर व यशवंत गावडे, सिंधु रक्तमित्र वेंगुर्ला अध्यक्ष ॲलिस्टर ब्रिटो,रक्त संघटक महेश राऊळ, एचडीएफसी चे बस्त्याव मेंडिस व महेश सावंत,सिद्धार्थ कलाविष्कार युवक मंडळ चे प्रतिनिधी विजय तुळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडुलकर यांनी प्रतिष्ठान च्या रक्तदान चळवळीचा आढावा घेत, विविध रक्तगट प्रकार, रक्ताचे विविध आजार आणि रक्तदान शिबीरांचे महत्व याविषयी मार्गदर्शन करीत सर्वांनी रक्तदान चळवळीमध्ये सहभागी होऊन उत्तम कार्य करत राहूया, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस ही सामाजिक क्षेत्राबरोबरच रक्तदान क्षेत्रामध्ये कार्य करणारे अग्रणी संस्था असून अशी संस्था सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानची मित्रसंस्था असल्याबद्दल आपणाला अभिमान आहे असे प्रतिपादन केले.
डॉ. लोखंडे यांनी रक्तदानाचे फायदे विषद करीत रक्तदान करा असे युवकांना आवाहन केले. *प्रतिष्ठान शी असलेल्या स्नेहामुळे तुळस, वेंगुर्ला,मातोंड, कणकवली, पेंडुर,गोवा,आसोली, पाल, मुणगी, दोडामार्ग,झाराप, साळगाव, शिरोडा,मळगाव, होडावडे, दाभोली आदी ठिकाणांहून येऊन दात्यानी रक्तदान करीत सहकार्य केले.या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या दात्यानी रक्तदान केले त्या सर्व रक्तदात्याना चित्रकार वामन तुळसकर हे स्वतः स्केच काढून भेट देणार आहेत.
सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र आणि नैसर्गिक गुणवत्ता वाढवणारे कैलासपती रोप देऊन सन्मान करण्यात आला. शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वेताळ प्रतिष्ठानच्या सुधीर चुडजी,सागर सावंत, सद्गुरू सावंत,मंगेश सावंत,प्रदीप परुळकर,प्रसाद भणगे,विधी नाईक, वैष्णवी परुळकर, प्रांजल सावंत, भूमी परुळकर, भक्ती भणगे, हेमलता राऊळ,सचिन गावडे, प्रज्वल परुळकर,वामन सावंत, संकेश सावंत, धीरज तुळसकर, अक्षय तुळसकर, निलेश तुळसकर,राहुल तुळसकर,प्रतिक तुळसकर, साहिल तुळसकर,अनिकेत तुळसकर यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर व आभार गणेश सावंत यांनी मानले.
Post a Comment
0 Comments