जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अर्चना घारे-परब यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
सावंतवाडी मतदारसंघात मोठी लढत होण्याची शक्यता.
उमेश कुंभार
नवप्रभात NEWS
सावंतवाडी मतदार संघात गेली आठ वर्ष सतत कार्यरत असलेल्या अर्चना घारे-परब यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी सावंतवाडी येथील वैश्य येथील सभागृहात जाहीर मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली. गेली आठ वर्षे आपण या मतदारसंघात काम करत असताना येथील सर्व सामान्य मतदारांच्या समस्या जाणुन घेतल्या त्या सोडविण्यासाठी येथील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हा सर्वांनच्या आशीर्वादाने आपण ही निवडणूक लढविणार आहे.
'आता माघार नाही रडायचं नाही लढायचं ' असा नारा देत निवडणूक लढणार असल्याच जाहीर केल.
यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते , ग्रामस्थ व महिलां यांनी अर्चना घारे-परब यांनी हि निवडणूक लढवावी यासाठी समर्थन दिले.
मेळाव्यानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सौ. अर्चना घारे-परब यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी कार्यालयात सादर केला. त्यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला व सर्व सामान्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments