अर्चना घारे - परब नाराज, बंडखोरीच्या तयारीत.
कार्यकर्त्यांचा आग्रह; उद्या सावंतवाडीत मेळावा घेऊन भूमिका जाहीर करणार
उमेश कुंभार
नवप्रभात NEWS
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राजन तेली यांचे नाव जाहीर करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादीच्या माध्यमातून विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या अर्चनाताई घारे- परब यानी नाराजी व्याक्त केली असून त्या बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.सावंतवाडी मतदारसंघात असलेला जनतेशी असलेलादांडगा जनसंपर्क लक्षात घेता त्यांना उमेदवारी मिळायला हवी होती..त्यांच्या रूपाने स्वच्छ ,प्रतीभा संपन्न नविन चेहरा आमदार म्हणून सावंतवाडी मतदार संघाला मिळणार आहे असे असताना महाविकास आघाडीच्या या घोळक्यात त्यांना दुर ठेवण्यात आल्याने सावंतवाडी मतदार संघातील कार्यकर्ते नाराज झाले असून...त्यांनी अर्चनाताईना बंडखोरी करण्याचा आग्रह धरीला असल्याने उद्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून अर्चनाताई घारे-परब आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे समजते.
Post a Comment
0 Comments