Type Here to Get Search Results !

युवती छेड प्रकरणी प्रमुख संशयिताला जामीन मंजूर

युवती छेड प्रकरणी प्रमुख संशयिताला जामीन मंजूर

   कणकवली
नवप्रभात NEWS 

 युवतीची छेड, विनयभंग व अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला प्रमुख संशयित आरोपी हरिराम मारुती गीते (रा. नांदेड) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. देशमुख यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर केला आहे. संशयितातर्फे अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

यातील हरिराम गीते वगळता उर्वरित पाच संशयितांना यापूर्वीच न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तर गीते याच्यावतीने दाखल जामीन अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयात संशयितातर्फे सादर केलेल्या घटनास्थळाची सॅटेलाईट ईमेज, ऑडिओ, व्हीडिओ रेकॉर्डिंग आणि घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज विचारात घेऊन फिर्यादीतील घटनेचे वर्णन व प्रत्यक्ष वस्तुस्थिती यातील विरोधाभास न्यायालयासमोर आणला..

Post a Comment

0 Comments