मातोंड येथे सातेरी मंदिरात ३ ते १० या कालावधीत नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
उमेश कुंभार
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथील श्री देवी सातेरी युवक कला क्रिडा मंडळाच्या वतीने ३ ते १० ॲाक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
गुरुवार ३ रोजी घटस्थापना,सायंकाळी ७ वाजता गावठणवाडी,नाटेलवाडी मटवाडी देवगावडेवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम,शुक्रवार ४ रोजी सायंकाळी ७ वाजता सातवायंगणी व खालचे बांबर यांची भजने,रात्री ८ वाजता निमंत्रित दांडिया नृत्य,रात्री ९ वाजता जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा,शनिवार ५ रोजी सायंकाळी ७ वाजता काजिरमळा व नेवाळेवाडी,यांची भजने,रात्री ८ वाजता निमंत्रित दांडिया नृत्य रात्री ९ वाजता डबलबारी भजनाचा सामना अष्टविनायक भजन मंडळ,साळेल ( मालवण ) बुवा - अंकिता गावडे पखवाजसाथ- बबन मेस्री,तबला- मकरंद सावंत विरुद्ध श्री स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळ,लोरे ( नरामवाडी, कणकवली ) बुवा - रिया मेस्री पखवाजसाथ- मिलिंद लाड,तबला- प्रथमेश लाड यांना साथ करणार आहेत.रविवारी ६ रोजी सायंकाळी ७ वाजता वरचा सावंतवाडी व भरभरेवाडी यांची भजने,रात्री ८ वाजता निमंत्रित दांडिया नृत्य,रात्री ९ वाजता ओमी डान्स ॲकॅडमी पुरस्कृत नटरंग ( मराठी,हिंदी,नृत्याविष्कार,गायक,आणि हास्यसम्राट बहरदार कार्यक्रम,सोमवार ७ रोजी सायंकाळी ७ वाजता दुकानवाडा,व गावडेवाडी यांची भजन,रात्री ८ वाजता निमंत्रित दांडिया नृत्य,रात्री ९ वाजता जागतिक किर्तीचे महान जादुगार वैभवकुमार यांचा धमाल कार्यक्रम,मंगळवार ८ रोजी सायंकाळी वाजता मिरीस्तेवाडी न गोवळवाडी यांची भजने,रात्री ८ वाजता निमंत्रित दांडिया नृत्य रात्री ९ वाजता तुषार योगेश आर्ट्स झी मराठी फेम आर्क्टिक,उत्सव नवदुर्गेचा ( लावणी,वेस्टर्न डान्स,मोर डान्स, कोंबडा डान्स,पोपट डान्स,भूताचा डान्स,शंकासूर ( चिपळूण) बुधवार ९ रोजी सायंकाळी ७ वाजता नाईकवाडा पेंडूर व गंडाचीराई यांची भजने,रात्री ८ वाजता निमंत्रित दांडिया नृत्य,रात्री ९ वाजता चक्री भजनाचा कार्यक्रम ( बुवा - सचिन सावंत,सुशांत परब,दिपक मेस्री,विशाल घोगळे) गुरुवार १० रोजी दुपारी १ वाजता महाप्रसाद,रात्री ८ वाजता निमंत्रित दांडिया नृत्य,रात्री ९ वाजता खुला गरबा नृत्य,रात्री १० वाजता खेळ संगीत पैठणीचा,शुक्रवार ११ रोजी श्री देव रवळनाथ मंदिर मातोंड येथे दसरा उत्सव होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन समस्त गावकर मंडळी,देवस्थान कमिटी यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments