Type Here to Get Search Results !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांगांना सुवर्णसंधी... प्रत्येक तालुका पंचायतीमध्ये नोंदणी शिबिराचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांगांना सुवर्णसंधी... प्रत्येक तालुका पंचायतीमध्ये नोंदणी शिबिराचे आयोजन

   उमेश कुंभार 
नवप्रभात NEWS 

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग,अल्मिको व जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ADIP योजने अंतर्गत कुडाळ तालुक्याच्या दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे -कृत्रिम हात, पाय, कॅलिपर, कुबडी, काठी, रोलेटर, व्हिलचेअर, ट्रायसायकल, इलेक्ट्रिक ट्रायसायकल, ब्रेल किट, स्मार्ट काठी, स्मार्ट फोन, एम.एस.आय.डी किट, श्रावणयंत्र यांचे मोजमाप व नाव नोंदणी शिबीर दि. 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2024 दरम्यान पुढील वेळा पत्रकानुसार प्रत्येक तालुका पंचायत समिती मध्ये घेण्यात येईल - 
1) 3/10/24 कुडाळ 
2) 4/10/24 कणकवली 
3) 5/10/24 वैभववाडी 
4) 6/10/24 देवगड 
5) 7/10/24 मालवण 
6) 8/10/24 वेंगुर्ले 
7) 9/10/24 सावंतवाडी 
8) 10/10/24 दोडामार्ग 
सोबत आणावायाची आवश्यक कागदपत्रे- 
1) दिव्यांग प्रमाणपत्र 
2) आधार कार्ड 
3) यूडीआयडी कार्ड 
4) उत्पन्नाचे प्रमाणपत्र/ रेशन कार्ड 
5) दिव्यांगत्व दिसेल असे 2 फोटो
शिबिर मधे तपासणी खालील प्रकार च्या दिव्यांग व्यक्ती साठी असेल.
दिव्यांग प्रकार आणि साहित्य आणि अपंग टक्केवारी खालील प्रमाणे
१ .अस्थीव्यंग -   तीन चाकी सायकल ,
व्हील चेअर , काठी , कुबडी, सी. पी. चेअर  किमान ४०% आणि वर  दिव्यांग प्रमाणपत्
 टिप- बैटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल साठी किमान ८०% दिव्यांग प्रमाण पत्र आवश्यक ( बहिरा , अंध, मतिमंद नसावा आणि दोन्ही हाथ सुस्थितीत असावे )
अंध प्रवर्ग  ( १००% ) - प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थी  साठी  ब्रेल किट , अंध काठी .
इयत्ता १० पासून पुढे शिकत असल्यास 
स्मार्ट. फोन आणि सुगम्य केन ( सेन्सर अंध काठी) शाळेत शिकत असल्याचा पुरावा शाळेचे / कॉलेजचे ओळखपत्र किंवा बॉनफाईड आवश्यक.
कर्णबधिर - कानाची मशीन
हाथ व पाय नसल्यास कृत्रिम अवयव चे मोजमाप घेऊन नंतर कृत्रिम अवयव बसविण्यात येतील …
अधिक माहिती साठी संपर्क करा . अनिल शिंगाडे सर  
9765979450
DDRC
9322073992

Post a Comment

0 Comments