महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार समितीवर निवड झाल्याबद्दल तुषार नाईक यांचा भाजपा च्या वतीने सत्कार
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
"महाराष्ट्रराज्य शासनाचे लोककला अनुदान शिफारस समिती सदस्य म्हणुन सिंधुदुर्ग दशावतार चालक मालक बहुउद्देशीय संघाचे जिल्हाध्यक्ष आणि वेंगुर्ले येथील प्रसिद्ध नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळचे संचालक श्री तुषार (भाई) नाईक यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याबद्दल भाजपा च्या वतीने मोचेमाड येथील त्यांच्या घरी जाऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , मोचेमाड ग्रामपंचायत सदस्य नारायण गावडे , किसान मोर्चाचे सत्यवान पालव , बाबल नाईक उपस्थित होते .
राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेंतर्गत निवड समितीमध्ये नव्याने समावेश करण्यात आलेल्या १२ कलाक्षेत्रांकरीता शासकीय व अशासकीय सदस्यांचा समावेश करण्याबाबतचा शासन निर्णय 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग जाहीर केला आहे यामध्ये तुषार नाईक यांच्या नावाचा समावेश आहे.
त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र व गोव्यातील विविध ठिकाणाहून त्यांचे अभिनंदन होत आहे .
Post a Comment
0 Comments