Type Here to Get Search Results !

जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री. महेश माणगांवकर व उपाध्यक्षपदी श्री दिनेश खवळे यांची फेरनिवड

जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री. महेश माणगांवकर व उपाध्यक्षपदी श्री दिनेश खवळे यांची फेरनिवड

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गट-क ची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग येथील संघटनेच्या कार्यालयात पार पडली. सभेच्या प्रारंभी महाराष्ट्राचे स्फुर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळयास संघटनेचे अध्यक्ष श्री महेश माणगांवकर यांचेहस्ते पुष्पहार घालून त्यांना वंदन करणेत आले. त्यावेळी उपाध्यक्ष श्री दिनेश खवळे आदी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला व्यायालयीन कर्मचा-यांच्या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांचे हस्ते गुलाबपुष्य, सन्मानपत्र व रोख बक्षीस देवून सत्कार करण्यात आला. अध्यक्ष श्री. महेश माणगांवकर यांनी व्यवस्थापन समितीच्या वर्षभरातील कामकाजाचा आलेख आपल्या मनोगताद्वारे सर्व सदस्यांमोर मांडला. सभेच्या नियमित कामकाजानंतर चालू वर्षाकरीता पदाधिकारी, व्यवस्थापन समिती सदस्य व कार्यालय प्रमुख याकरीता निवडणुक कार्यक्रम घेणेत आला पदाधिकारी म्हणून अध्यक्ष श्री महेश माणगांवकर, उपाध्यक्ष श्री दिनेश खवले, सरचिटणीस श्री चेतन अरवारी, सहचिटणीस श्री. महेश भाटकर, खजिनदार श्री. फान्सिस मेडीस, व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून श्री. शितल सबनीस, श्री. कृष्णा आडणेकर, श्री. शैलेंद्र जाधव, श्री अजित परय व श्रीमती मनिषा परच यांची निवड करणेत आली. तसेब कार्यालय प्रतिनिधी महणून जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग श्री. चेतन नेरुरकर व श्रीमती प्रणाली सावंत, दिवाणी न्यायालय (व.स्तर), सिंधुदुर्ग- श्री विश्वनाथ परय, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, सिंधुदुर्ग श्री. गंगाधर तांबे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग श्री संजय गिरकर, दिवाणी न्यायालय, सावंतवाडी- श्री. संतोष राऊळ, दिवाणी न्यायालय, बेगुलर्ला श्री. भरत रेडकर, दिवाणी न्यायालय, कुडाळ श्री. रामचंद्र आरेकर, दिकणी न्यायालय, मालवण श्री. सदाशिव पालव, दिवाणी न्यायालय, कणकवली- श्री. संतोष पेडणेकर, दिवाणी न्यायालय, देवगड श्री. सुरेंद्र जाधव, दिवाणी न्यायालय, दोडामार्ग श्री सागर मालवणकर यांची निवड करण्यात आली. तसेच संघटनेच्या संल्लागारपदी श्री. शरद पाटील व श्रीमती नेहा सावंत यांची निवड करणेत आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री महेश माणगांवकर यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सरचिटणीस श्री. चेतन अरवारी यांनी केले.

Post a Comment

0 Comments