वीज चोरी केली, तर ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास
नवप्रभात NEWS / मुंबई
वीज ग्राहकांकडून वीज चोरी झाल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे.
वीजचोरी करणाऱ्यांच्या अवैध वीज वापराचा भार, नियमितपणे वीजबिले भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांवर विनाकारण पडतो. झोपडपट्टी विभागात जागा कमी असल्याने नव्या वीजजोडण्या देणे कठीण असते. तेथे आधीच विजेची मागणी जास्त असते. अवैध वीजजोडणी घेतल्यास तेथील वीज पुरवठ्यावर ताण येतो. त्यामुळे केबल, ट्रान्सफॉर्मर खराब होत असल्याने देखभाल खर्चही वाढतो, अशी माहिती वीज कंपन्यांनी दिली. यावर उपाय म्हणून वीज चोरीला आळा घालण्यासाठी कारवाई केली जात असून, गुन्हाही नोंदविला जात आहे.
वीजचोरी हा अदखलपात्र गुन्हा असून इलेक्ट्रिसिटी ॲक्ट २००३ च्या कलम १३५ नुसार दोषी व्यक्तीला आर्थिक दंड किंवा तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात
Post a Comment
0 Comments