विवाहित महिलेचा व्हिडीओ काढून खंडणी उकळल्याप्रकरणी आरोपीला जामीन
नवप्रभात NEWS / कणकवली
कणकवली तालुक्यातील एका गावातील विवाहिता आंघोळ करीत असताना तिचा व्हिडीओ काढला. तसेच तो 'व्हायरल' करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तब्बल २ लाख ७० हजार रुपये उकळल्याप्रकरणी विनयभंग व खंडणीचा गुन्ह्यात अटकेत असलेल्या रवींद्र नामदेव राऊळ (३५) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर केला आहे.
कथित घटना २०२२ ते २७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडली. पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती आपल्या घराजवळ असलेल्या ताडपत्रीच्या सहाय्याने बनविलेल्या स्वच्छतागृहात आंघोळ करत असताना संशयित रवींद्र याने गुपचूप व्हिडीओ काढला. काही दिवसांनी त्यानें तो व्हिडीओ विवाहितेला दाखविला. तो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली.
या धमकीच्या आधारे गेल्या दोन वर्षात त्याने विवाहितेकडून २ लाख ७० हजार रुपये उकळले. दरम्यान, २७ ऑगस्टला संशयिताने विवाहितेला गाठत पैशांची मागणी केली. तिने नकार दिला असता संशयिताने तिच्याशी अश्लील संभाषण करत पुन्हा एकदा तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
तसेच तिच्या अल्पवयीन मुलीशी देखील गैरवर्तन करण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता. याबाबत
पोलिसांनी विविध कलमाद्वारे गुन्हा क दाखल केला होता. यात काही रक्कम नि तक्रारदार महिलेने आरोपीला फोन पे स द्वारे पाठविल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.
आरोपीला दिवा येथून अटक केल्यानंतर त्याचा मोबाइलही जप्त करण्यात आला होता. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीतर्फे दाखल जामीन अर्जावर सुनावणी होत आरोपीची ५० हजाराच्या सशर्थ जामिनावर मुक्तता करताना अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, तपासात ढवळाढवळ करू नये, पोलिसांना सहकार्य करावे, आदी अटी घालण्यात आल्या आहेत. आरोपीच्या वतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
Post a Comment
0 Comments