Type Here to Get Search Results !

कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गणपती मंदिर, करमळी ते तुवाची राई, बिजोळेवाडी रस्ता डांबरीकरण करण्याची जनता दरबारात मागणी


कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गणपती मंदिर, करमळी ते तुवाची राई, बिजोळेवाडी रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी

  मनोज देसाई
नवप्रभात NEWS 

कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गणपती मंदिर, करमळी ते तुवाची राई, बिजोळेवाडी रस्ता डांबरीकरण करण्याविषयीची आग्रही मागणी पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना जनता दरबारात करण्यात आली.
तसेच, हुमरमळा येथील बी.एस.एन.एल. टॉवरची यंत्रणा अद्ययावत करावी , अशीही मागणी , हुमरमळा ग्राम पंचायत सदस्य, श्री. ॠषीकेश ऊर्फ बारीश रा. उपाध्ये आदींनी केली आहे.
     नुकत्याच ओरोस येथे झालेल्या जनता दरबारात ,सदर ग्रामस्थांच्या सह्यांसह मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सदरचा रस्ता पुर्ण पणे नादुरुस्त झाला आहे.वाहन सोडाच, चालणेही मुश्किल झाले आहे. या कडे बांधकाम मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.  
तर, हुमरमळा येथील टॉवर वरून , जरी संपर्क होत असला तरी, त्यात बाधा येते. याबाबत ही बी.एस.एन.एल.च्या अधिका-यांचे लक्ष अर्जाद्वारे वेधण्यात आले.

Post a Comment

0 Comments