केळूस गावाच्या विकासासाठी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी दिला हे मान्यच पण, योग्य व परिपूर्ण माहिती जनतेसमोर आणावी.- केळूस सरपंच योगेश शेटये.
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले- केळूस गावात शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी दिल्याबाबत केळूस सरपंच श्री. योगेश शेटये म्हणाले महाराष्ट्र राज्याचे विद्यमान शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर व सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग विधानसभा मतदार संघाचे सलग तीन वेळा झालेले आमदार या नात्याने त्यांच्या माध्यमातून केळूस गावात विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मंजूर होऊन काही कामे पुर्ण झाली व काही कामे सद्यस्थितीत मंजूर आहेत ही वस्तुस्थिती आहे. याबाबत केळूस गावचा सरपंच या नात्याने तसेच यापूर्वीच्या काळातील एक दिपकभाई प्रेमी या नात्याने गावाच्यावतीने मंत्री महोदयांचे वेळोवेळी आभार मानले आहेत. केळूस गावाच्या जनतेला कोणाच्या माध्यमातून किती विकास निधी येतो याबाबत काही वेगळ्या पद्धतीने सांगण्याची आवश्यकता नाही. परतुं श्रेयवादाच्या या लढाईत घाईगडबडीत आपल्याकडून चुकीची तर माहिती प्रसिद्ध होत नाही ना याची खातरजमा सुद्धा जबाबदारीचे पद असलेल्या व्यक्तिंनी करावी अन्यथा चुकीची माहिती जनसामान्यांत गेल्याचे वाईट परिणाम हे आपल्या नेत्यांवर होत असतात याची जाणीव ही असण्याची गरज आहे असे म्हटले आहे. केळूस गावात झालेल्या कामांची किंवा खात्रीशीर मंजूर असलेल्या कामांची यादी प्रसिद्ध झाली असती तर अधिक चांगले झाले असते, ज्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अथवा प्रयत्नातून ही कामे मंजूर आहेत असे म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांचा आपण आपल्या पक्षात प्रवेश कधी घेतला आणि या कामांना मंजूरी कधी मिळाली याचा ताळमेळ होतो का याची सुद्धा खात्री करावी, जेणेकरून सर्व सामान्य जनतेपर्यंत योग्य व परिपूर्ण माहिती जाईल, नाहीतर विकासकामांची यादी प्रसिद्ध करण्याच्या नादात गावातील सामान्य मतदारांमध्ये संघर्ष लागून सामाजिक सलोखा बिघडेल असे होऊ नये. मंत्री महोदयांच्या तीन्ही टर्मच्या निवडणुकीत केळूस गावाच्या मतदारांनी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता मतदानरुपी केलेली भरघोस मदत व कार्यकर्ता म्हणून आमच्या सारख्या अनेकांनी दिलेली साथ याची परतफेड करण्याच्या मनसुब्याने केळूस गावात कोट्यावधी रुपयांची विकास कामे मंत्री महोदयांनी शासनाच्या माध्यमातून दिली असतील. मंत्री महोदय आणि मी, नेता आणि कार्यकर्ता या नात्याने सन २००९ पासून अगदी अलिकडच्या काळापर्यंत एकत्र काम केलेले आहे. मध्यंतरी घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे आज दोन वेगवेगळ्या पक्षात आम्ही जरी काम करीत असलो तरी मैत्रीचे नाते हे वेगळेच असते, म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील सक्रिय कार्यकर्ते तथा शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, दिवंगत जिल्हा परिषद सदस्य सुनिल म्हापणकर, भोगवेचे माजी सरपंच तथा सर्वाचे जेष्ठ मार्गदर्शक महेश सांमत यांच्या सारख्या अनेक सहकाऱ्यांच्या सहकार्याने सन २००९ सालापासून विकास कामे केळूस मध्ये दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून होत आहेत आणि केळूसची जनता मतदानातून त्या विकासकामांची जाणीव ठेवत आहे. माझे अनेक मित्र मंत्री महोदयांसोबत आज काम करीत आहेत आणि त्या मैत्रीच्या नात्यानेच त्यांना माझे सांगणे आहे की, योग्य व परिपूर्ण माहिती जनतेसमोर कशी जाईल याचा नक्की विचार व्हावा असे मत योगेश शेटये व्यक्त केले.
Post a Comment
0 Comments