वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात "राष्ट्रीय पोषण आहार माह" कार्यक्रम संपन्न
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
मा. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. पाटीलसर यांच्या सुचनेनुसार व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. इंगळेसन यांच्या मार्गदर्शनाखाली "राष्ट्रीय पोषण आहार माह" च्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला येथे एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला.
यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन प्रत्येकी एक असे पोषक आणि चविष्ट खाद्यपदार्थ बनवुन आणले व या पोषक खाद्यपदार्थांचे गरोदर माता, स्तनदा माता व इतर नागरिकांपुढे प्रदर्शन करण्यात आले. लहान मुलांच्या वाढीसाठी तसेच गरोदर व स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांच्यातील रक्तक्षय कमी करण्यासाठी अशा पोषक व पुरक आहाराचे महत्त्व सांगण्यांत आले. तसेच नवजात बालकांसाठी स्तनपानाचे महत्त्व अतिसार टाळण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व हात्त धुण्याच्या पध्दती इत्यादी सांगण्यात आले हा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमामध्ये वैद्यकीय अधिकारी मा डॉ. किरण कुंटे व मा. डॉ. पवार यांनी उपस्थित मातांना सकस व आवश्यक आहाराविषयी मार्गदर्शन केले शारिरीक व मानसिक वाढीसाठी व आवश्यक पोषण मुल्याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाला रुग्ण नातेवाईक किलोवयीन मुले, पालक व कर्मचारी यांची उपस्थिती होती. सदन कार्यक्रम मा. वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदिप सावंत उपजिल्हा रुग्णालय, बेंगुर्ला यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
Post a Comment
0 Comments