Type Here to Get Search Results !

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत स्वच्छता प्रश्नमंजुषा संपन्न

 वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत स्वच्छता प्रश्नमंजुषा संपन्न

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत “स्वच्छता ही सेवा” (स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता) ही मोहीम देशात दि. १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्‍यात येत आहे. या अनुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. आज दिनांक २४/०९/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता नाटककार मधुसुदन कालेलकर सभागृह, वेंगुर्ला  येथे स्‍वच्छता प्रश्नमंजूषा पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन वयोगटात आयोजित करण्‍यात आलेली होती. ही प्रश्‍नमंजूषा स्‍वच्‍छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान, सामान्‍य ज्ञान (पाठयपुस्‍तकावर आधारीत) व चालु घडामोडी या विषयांवर आधारीत होती. या कार्यक्रमाची सुरुवात मान्‍यवरांचे हस्‍ते दीपप्रज्वलन करुन करण्‍यात आली. याप्रसंगी मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ, जिल्‍हा नियोजन समिती सदस्‍य श्री. दिलीप गिरप व श्री. सचिन वालावलकर, वेंगुर्ला हायस्‍कूलचे मुख्‍याध्‍यापक श्री. प्रमोद कांबळे, मदर तेरेसा स्कूल वेंगुर्लाचे मुख्‍याध्‍यापक श्री. फेलीक्‍स लोबो, परिक्षक श्री. संतोष पवार व श्री. तानाजी चव्‍हाण, बॅ. नाथ  पै सेवांगण संस्‍थेचे श्री. देवदत्‍त परुळेकर तसेच प्रशासकीय अधिकारी सौ. संगिता कुबल, पत्रकार श्री. दाजी नाईक व श्री. महेंद्र मातोंडकर उपस्थित होते. जिल्‍हा नियोजन समिती सदस्‍य श्री. दिलीप गिरप, जिल्‍हा नियोजन समिती सदस्‍य श्री. सचिन वालावलकर व बॅ.नाथ पै सेवांगण संस्‍थेचे श्री. देवदत्‍त परुळेकर यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढून वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या भावी वाटचालीस शुभेच्‍छा दिल्‍या.
या स्‍पर्धेच्‍या पाचवी ते सातवी या वयोगटामध्‍ये वेंगुर्ला हायस्‍कूल, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग विदयानिकेतन‍ इंग्लिश मिडीयम स्‍कूल, वेंगुर्ला, जि.प. प्राथमिक शाळा क्र. १,२,३ व ४ या 6 शाळांचे स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्‍ये प्रथम क्रमांक कु. दिशा महेश गावकर व कु. रक्षिता अजित रेडकर (जि.प. प्राथमिक शाळा क्र. २), द्वितीय क्रमांक कु. सई  संतोष शिरगांवकर व सुयोग समुद्रे (वेंगुर्ला हायस्‍कूल, वेंगुर्ला) व तृतीय क्रमांक कु. निल प्रीतम पवार व कु. वेद अभिषेक वेंगुर्लेकर (जि.प. प्राथमिक शाळा क्र. १) यांनी प्राप्‍त केले. 
 तसेच आठवी ते दहावी या वयोगटामध्‍ये वेंगुर्ला हायस्‍कूल, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग विदयानिकेतन‍ इंग्लिश मिडीयम स्‍कूल, वेंगुर्ला, मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला व रा.कृ.पाटकर हायस्‍कूल  वेंगुर्ला या शाळांचे विदयार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्‍ये प्रथम क्रमांक कु. दुर्वा महेश गांवकर व कु. रिशिता संदीप बोवलेकर (रा.कृ.पाटकर हायस्‍कूल वेंगुर्ला) व द्वितीय क्रमांक कु. सिद्धी गावडे व कु. श्रेया मराठे (सिंधुदुर्ग विदयानिकेतन‍ इंग्लिश मिडीयम स्‍कूल, वेंगुर्ला) यांनी प्राप्‍त केले. 
स्वच्छता व पर्यावरण संवर्धन यांचे महत्त्व विद्यार्थ्यांवर बिंबवणे या प्रमुख उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली होती तसेच युवा पिढी ही भविष्‍यातील देशाच्या उज्‍वल भवितव्याचा पाया असून त्‍यांची बौद्धीक क्षमता वाढविणे व मोठया स्‍पर्धेमध्‍ये सहभागी होण्‍याबाबत त्‍यांच्‍यामध्‍ये आत्‍मविश्‍वास निर्माण करणेसाठी सिंधुदुर्ग जिल्‍ह्यामध्‍ये अशा प्रकारची स्‍वच्छता प्रश्नमंजूषा आयोजित करणारी वेंगुर्ला नगरपरिषद ही एकमेव नगरपरिषद असल्‍याचे मत मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी व्‍यक्‍त केले.

Post a Comment

0 Comments