माणकुली विद्यालयास मनोरमा चौधरी ट्रस्टतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप.
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
मागासवर्गीय एज्यू. सोसायटी मांडकुली- केरवडे संचलित प. पू आपासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयास कै. मनोरमा महादेव चौधरी चॅरीटेबल ट्रस्ट वालावल ता. कुडाळ संस्थेकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सन्मा. दयानंद चौधरी, कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे, ट्रस्टचे सचिव संदिप साळसकर, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, संस्था सचिव अंकुश जाधव, खजिनदार अर्जून परब, उपखजिनदार सौ. करीष्मा भोई, संचालक सतीश पडते, श्री. वामन गावडे शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष बाबाजी पेडणेकर, देवदत चुबे सर, शिक्षक ,पालक ई.उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुणे यांचा परिचय मुख्या. श्री खोत सर यांनी करून दिला. संस्था व प्रशालेच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष *चौधरी यांना कानडे सरांतर्फे शिवप्रतिमा देऊन गौरविण्यात आले.* त्याचं प्रमाणे उपस्थीत मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. *कै.मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश, फॅन, वहया, ट्यूबलाईटस, ईत्यादी साहित्याचे वितरण करण्यात आले* तसेच चौधरी यांचे मित्र सुर्यकांत बागवे यांनी विद्यार्थ्यांसाठी आर्थिक स्वरूपात मदत केली. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना, रुपेशजी कानडे यांनी प्रशालेच्या शैक्षणिक प्रगतीबाबत कौतुक करून प्रशालेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. साळसकर सर यांनी ट्रस्टच्या कामाबाबत माहती देवून विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेवून आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे विचार मांडले. सन्मा. दयानंद चौधरी यांनी ग्रामीण भागात शाळा असून चांगले काम चालू असल्याबाबत शिक्षकांवर्गास धन्यवाद दिले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण का घ्यावे? याबाबत मार्गदर्शन केले. आपण आपल्या ट्रस्टकडून प्रशालेला एक स्मार्ट टीव्ही देण्याचे व विविध गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच सहकार्य करण्याचे आश्वासीत केले. तहसीलदार वसावे यांनी, स्पर्धा परीक्षा व करीअर संधी याबाबत मार्गदर्शन करून पुन्हा प्रशालेस भेट देवून पालक व विद्यार्थी यांची आपण कार्यशाळा घेऊ असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सरवटे सर यांनी केले तर आभार सौ. रांगणेकर मॅडम यांनी मानले. कार्यक्रम उत्कृष्ट आयोजन राहूल कानडे सरांनी केले.
Post a Comment
0 Comments