संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामसेवक श्री. शरद श्रीरंग शिंदै यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळेबाजार, या ग्रामपंचायतीला राज्यस्तरावर यश संपादन केले आहे.त्यातील वेंगुलॅ तालुक्यातील परूळेबाजार गावचे ग्रामसेवक श्री शरद श्रीरंग शिंदे यांना
महाराष्ट्र शासनाच्या पाणी व स्वच्छता
मिशन विभागामार्फत विशेष सत्कार सोहळा संत एकनाथ रंगमंदिर, छत्रपती संभाजीनगर येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी पार पडणार आहे
श्री. शरद श्रीरंग शिंदे हे मूळचे अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील आढळगावचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल तालुक्यातील परूळेबाजार आपली कर्मभूमी मानून आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत.परूळेबाजार म्हणून आपले कर्तव्य पार पाडत असताना अचूक नियोजन आणि परिपूर्ण कार्यवाही या दुहेरी तत्वावर भर दिला. त्याचीच परिणीती म्हणजे परूळेबाजार ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळाले आहे.
श्री. शरद श्रीरंग शिंदे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे. सध्या त्यांच्याकडे वेंगुर्ले तालुक्यातील मेढा निवती ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार आहे. आपल्या बुद्धिमत्ता, अचूक नियोजन आणि कल्पकतेच्या जोरावर ते याहीपेक्षा चांगल यश संपादन करतील असा विश्वास सर्वसामान्य आणि अधिकारी वर्गातून व्यक्त होत आहे.
Post a Comment
0 Comments