Type Here to Get Search Results !

'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियानात हिर्लोकचे शिवाजी विद्यालय जिल्ह्यात प्रथम

'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियानात हिर्लोकचे शिवाजी विद्यालय जिल्ह्यात प्रथम 

११ लाखांचे बक्षीस जाहीर 
 जिल्हास्तरीय  स्पर्धा
 पहिल्या टप्प्यातही 5 लाखांचे पटकावले होते प्रथम बक्षीस 

   मनोज देसाई 
नवप्रभात NEWS 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा - दोन (2024 25) या अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक गटातून शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कूलने प्रथम क्रमांक प्राप्त करत 11 लाख रुपयांचे बक्षीस पटकविले. 
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात जिल्हावार उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक गटातून कुडाळ तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कुने प्रथम पटकावला. गेल्या वर्षी या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात या विद्यालयाने द्वितीय क्रमांक प्राप्त करत पाच लाख रुपयांचे बक्षीस पटकाविले होते.
शिक्षण विभागाने एकूण 150  गुणांकनाच्या आधारे शाळेचे मूल्यमापन केले असून यामध्ये शाळेची गुणवत्ता, भौतिक सुविधा, विद्यार्थी लाभाच्या प्रभावीपणे राबवलेल्या योजना, इको क्लब, सोलर सिस्टिम, १००% विद्यार्थी आधार, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ७५ वेगवेगळे उपक्रम राबवून इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केलेली नोंद, स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय राबविलेला उपक्रम, १० वीचा १००% टक्के निकाल, एन एम एम एस राष्ट्रीय शिष्यवृत्ती व स्कॉलरशिप यामध्ये  मिळालेली शिष्यवृत्तीचा लाभ, गुणवत्ता वाढ करण्यासाठी शाळेने राबवलेले वेगवेगळे उपक्रम, कौशल्य विकास अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या बांधकाम आणि शेती तंत्रज्ञान कार्यशाळा, अभियांत्रिकी तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पर्यावरण, तसेच अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान विभाग या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी केलेल्या अभिनव  उपक्रमांतर्गत मॉडेल स्कूल निर्मिती, आधुनिक पद्धतीचे परसबाग, आपत्ती व्यवस्थापन उपक्रम, विद्यार्थ्यांमध्ये राबवलेली स्वच्छतेविषयी जागृती, सुका कचरा, गांडूळ खत निर्मिति, पोषण आहारातील टाकाऊ अन्न खाद्यपदार्थांमधून केलेला बायोगॅस निर्मितीचा अभिनव उपक्रम, तंबाखूमुक्त शाळा, मेरी माटी मेरा देश अंतर्गत राबविलेल्या उपक्रमातून केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय मिळवलेले यश, कौशल्य विकास अंतर्गत विद्यार्थ्यांचे चालू असलेले प्रशिक्षण , शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आर.ओ. शुद्ध पेयजल पुरवठा, 15 हँड वॉश स्टेशन, विद्यार्थी व शिक्षकांच्या कल्पकतेने वर्गाचे व शाळेच्या बोलक्या भिंतींचे केलेले रेखाटन व सुशोभीकरण, संस्था पदाधिकारी व शिक्षकांच्या सहकार्यातून पट संख्येत वाढ करण्याच्या उद्देशाने आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांनी प्रशालेत घेतलेला प्रवेश तसेच शाळेने राबवलेल्या प्रभावशाली उत्कृष्ट उपक्रमांचा विचार या मूल्यांकनामध्ये करण्यात आला. शाळेतील परिसरामध्ये वनौषधी व पर्यावरण पूर्वक वातावरण निर्मितीसाठी केलेले वृक्षारोपण, आनंददायी वर्ग, वर्गात एलईडी टीव्ही मार्फत विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग सुविधा व आधुनिक तंत्रज्ञानाने केलेले अध्ययन अध्यापन, आधुनिक प्रयोगशाळेचा वापर करून गेली दोन वर्ष सातत्याने विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा मान, आनंददायी शनिवारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी  विद्यार्थ्यांचे राबवीलेले उपक्रम, आयसीटी लॅबमध्ये मार्फत विद्यार्थ्यांचे घेतलेले कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण,शालेय प्रशासकीय कार्यालयीन सर्व कागद कागदपत्रांची शाळेची दाखले बोनाफाईड सर्व निकाल पत्रके यांची नोंद, क्रीडा स्पर्धेत मिळालेली पारितोषिके, ढोल पथक व लेझीम पथक, शाळा विकासासाठी मोठ्या प्रमाणात घेतलेला लोकसहभाग मदत, शासनाच्या महावाचन चळवळीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी घेतलेला सहभाग, विविध वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धांमध्ये सहभाग, मतदार जनजागृती साठी प्रचार व  प्रसारासाठी राबविलेले उपक्रम, पंचक्रोशीतील असाक्षर प्रौढ व्यक्तींच्यासाठी राबविलेला उपक्रम,मराठी मालिकांमध्ये (वेतोबा मालिका) कु. संचित तांबे या विद्यार्थ्याने घेतलेला सहभाग  विद्यालयामध्ये राबवण्यात येणारे स्काऊट गाईडचे उपक्रम, विद्यांजली पोर्टलच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सुविधेसाठी घेतलेले सहकार्य, दिव्यांग मुलांसाठी उभारलेले स्वच्छतागृह, मुलींच्या सुरक्षेसाठी सखी सावित्री व विद्यार्थी सुरक्षा समिती मार्फत राबविलेले उपक्रमस, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा भिंत, मासिक पाळी व्यवस्थापन व मुलींच्या आरोग्यविषयक समस्यांचे तज्ञ मार्गदर्शकाच्या माध्यमातून केलेले मार्गदर्शन, एक सुरक्षित शाळा म्हणून मिळालेली समाज मान्यता, निसर्गरम्य शालेय परिसर, शिक्षकांनी वाढवलेली शैक्षणिक अर्हता या सर्व बाबींचा माध्यमिक शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांनी परीक्षण करून गुणांकाच्या आधारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात माध्यमिक गटातून शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कुलने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
त्याबद्दल संस्था पदाधिकारी, पालक शिक्षक संघ, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी व सेवाभावी संस्था तसेच पंचक्रोशीतील दानशूर व्यक्ती यांच्या सहकार्यातून या उपक्रमात यश प्राप्त झाल्याचे मुख्याध्यापक दिनेश म्हाडगुत यांनी सांगितले.
 या उपक्रमात हिर्लोक  पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ हिर्लोक, संचलित शिवाजी विद्यालय हिर्लोक  हायस्कूलने प्रथम क्रमांक प्राप्त करून संस्थेला व प्रशालेला नावलौकिक प्राप्त करून दिल्याबद्दल मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती यांचे संस्था अध्यक्ष उदय सावंत, कार्याध्यक्ष शसूर्यकांत नाईक, उपाध्यक्ष गुरुदास कुसगावकर, सचिव दीपक नारकर, खजिनदार  बाजीराव झेंडे, सह सचिव पंढरीनाथ सावंत, तसेच सर्व संचालकांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments