नारुर परिसरात ढगफुटीने नदीला पूर; शेतीचे नुकसान
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाला कालपासून पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. काल संध्याकाळी रांगणा गड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळला. यामुळे कुडाळ तालुक्यातील नारुर गावातून वाहणाऱ्या गड नदीला पूर आला असून नदी लगतच्या भातशेतीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून प्रशासनाने दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, जुलै महिन्यात सुद्धा अशाच प्रकारे ढगफुटी होऊन नारुर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. येथील समतानगर मध्ये जाणारा रस्ता तीन दिवस पाण्याखाली होता. तेव्हा सुद्धा भातशेतीचे नुकसान झाले होते. अवघ्या दोन महिन्यांत दोन वेळा नुकसान झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.
Post a Comment
0 Comments